नाशिक. Ashok Kharat Nashik Crime Case: 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याची एचआयव्ही (HIV) चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल समोर आला आहे. वैद्यकीय तपासणीत खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर  आली आहे.

SIT कडून कसून चौकशी सुरू-

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या काळात विविध पैलूंवर तपास केला जात आहे.

महिलांच्या तक्रारींमुळे खळबळ-

खरातवर अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

• ‘उपचार’ आणि ‘संतानप्राप्ती’चे आमिष

    • भीती दाखवून जबरदस्ती संबंध

    • आर्थिक फसवणुकीचेही आरोप या तक्रारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    आरोग्य तपासणी का महत्त्वाची?

    प्रकरणात अनेक महिलांचा संबंध आल्याने आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून आरोपीची HIV चाचणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी संबंधित महिलांची वैद्यकीय तपासणीही महत्त्वाची मानली जात आहे.

    आणखी धक्कादायक खुलाशांची शक्यता-

    SIT चौकशीतून पुढील बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे:

    • आणखी पीडित महिलांची नावे समोर येण्याची शक्यता

    • आर्थिक व्यवहारांचा तपास

    • इतर सहकारी किंवा जाळ्याचा शोध घेण्यात येणार आहे.