नाशिक. Ashok Kharat Scandal: नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. महिलांवर अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याची कोठडी आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशोक खरात त्याच्याकडे आलेल्या महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचा. नंतर बडे उद्योगपती, व्यावसायिकांनाही बायचा पुरवायचा. त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या जोड्या बनवत असल्याचे समोर आले आहे.
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, प्रशासनातील अधिकारी, राजकीय नेते या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना साप व वाघाचे कातडे दाखवून घाबरवायचा व घोरी कृत्ये करुन त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
पुरुषांना महिला पुरवायचा -
या प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे की, अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करतच होता. पण त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवत होता. याच्या माध्यमातून खरातने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल करून लुटले असण्याची शक्यता आहे. अशोक खरात आधी स्वत: महिलांशी लैंगिक चाळे करायचा व पीडित महिलांना धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणायचा, त्यातूनही तो पैसे कमवत असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थिनीलाही सोडले नाही -
अशोक खरात सिन्नर येथील कार्यालयातच महिलांचा लैंगिक छळ करायचा. त्याने अनेक महिलांना बळी बनवल्याचे समोर आले आहेत. अजूनही काही महिला भीतीपोटी आणि सामाजिक दबावापोटी तक्रार करायला समोर येत नसल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांनी एक खास हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून महिलांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
एकून गुन्ह्यांची संख्या झाली 6-
दरम्यान भोंदू खरात विरोधात आणखी तीन नवे गुन्हे दाखल झाले असून आता एकूण गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या नराधमाने विद्यार्थिनीला देखील सोडलं नाही, असा गंभार आरोपही त्याच्यावर आहे.
