जेएनएन, बुलढाणा. Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी 11 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 

खासगी बसचा चेंदामेंदा

अपघात इतका भीषण होता की, खासगी बसचा चेंदामेंदा झाला आणि अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले. जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

असा झाला अपघात

समृद्धी महामार्गावरील मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी 'बाबा ट्रॅव्हल्स'ची लक्झरी बस समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. 

11 जणांची प्रकृती चिंताजनक

    अपघातातील गंभीर जखमी झालेल्या 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.