मुंबई. राज्यात लॉकडाऊन लागू होणार आणि इंधन टंचाई निर्माण होणार अशा अफवांनी नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता अखेर दूर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट सांगितले की, राज्यात तसेच देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही.

अफवांमुळे निर्माण झाली भीती-

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर LPG गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होणार तसेच कोरोनासारखा लॉकडाऊन लागू होणार अशा संदेशांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत होता. या मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दीही दिसून आली.

सरकारचे आश्वासन!

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की:

• इंधनाचा पुरवठा सुरळीत आहे

    • देशात कोणतीही टंचाई नाही

    • लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय नाही

    त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई-

    देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला की,सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.फक्त अधिकृत सरकारी माहितीवर विश्वास ठेवा. सोशल मीडियावरील अप्रमाणित मेसेज पुढे पाठवू नका.घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.