मुंबई. Shardiya navratri 2026 wishes in Marathi: शारदीय नवरात्र ही दुर्गा देवीला समर्पित असलेला सर्वात मोठा सण आहे. या वर्षी शारदीय नवरात्र 2026 ची सुरुवात अत्यंत शुभ योगात होत आहे. नऊ दिवसांपर्यंत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि घरोघरी जय माता दी चे जयघोष घुमतात. नवरात्र हा फक्त उपवास आणि पूजेचाच नाही, तर आपल्या माणसांची आठवण काढण्याचा आणि आनंद वाटण्याचाही सण आहे.
या पावन प्रसंगी प्रत्येक जण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देतो. जर तुम्हालाही तुमच्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दुर्गा देवीचे प्रेमाने भरलेले आणि मनाला स्पर्श करणारे शुभेच्छा संदेश. या सुंदर विशेस, शायरी आणि कोट्स तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करू शकता आणि सर्वांना म्हणू शकता, जय माता दी.
शारदीय नवरात्री शुभेच्छा संदेश (Shardiya Navratri Wishes in Marathi 2026)

1- नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

2- दुर्गा देवी आल्या तुमच्या दारी,
घेऊन आनंद आणि प्रेम अपार।
प्रत्येक स्वप्न तुमचे पूर्ण होवो,
जीवनात सुखांची बहार होवो।
शुभ शारदीय नवरात्र!
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

3-आई दुर्गेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य नांदो.
तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो आणि
घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहो.

4 - नऊ रंगांचा उत्सव,
नऊ दिवसांचा आनंद,
देवीची कृपा राहो,
घरात सुख नांदो,
मनात भक्ती फुलो,
प्रत्येक दिवस सुंदर होवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

5- घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

6- अंबेच्या चरणी वंदन,
मनात श्रद्धा राहो,
आयुष्यात सुख नांदो,
नात्यांमध्ये प्रेम वाढो,
प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
आनंदाची बरसात होवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

7-लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि देवी दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

8- आई दुर्गेची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो.
तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्याचे बळ मिळो आणि
आयुष्य आनंदाने फुलून जावो.
सर्वांना शारदीय नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

9- आई भवानीची कृपा,
सदैव तुमच्यासोबत राहो,
घरात समृद्धी नांदो,
मनात उत्साह फुलो,
प्रत्येक अडचण दूर होवो,
यश तुमच्या पदरी पडो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

10-आई अंबेच्या दरबारात झुकवा सिर,
मनातील सारे कष्ट दूर करा,
आनंदाने भरेल झोळी,
आई करेल प्रत्येक संकट दूर
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
