Bhaubeej 2026 Wishes in marathi: ’यंदा बुधवार, 11 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज भाऊबीज साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते. तर भाऊही बहिणीला प्रेमाची भेट देत तिच्या कायम पाठीशी राहण्याचे वचन देतो. बालपणीची भांडणं, एकमेकांची काळजी आणि आयुष्यभराची साथ अशा अनेक आठवणींनी भाऊ-बहिणीचं हे नातं अधिक घट्ट होतं. नात्याची वीण मजबूत होत असते.

पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. यमुनाने त्यांचे औक्षण करून प्रेमाने स्वागत केले. तिच्या आदरातिथ्याने प्रसन्न झालेल्या यमराजांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हापासून या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करावे आणि भावाने तिचे रक्षण व सुखाची जबाबदारी घ्यावी, अशी परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.

या खास दिवशी आपल्या भावाला किंवा बहिणीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी व प्रेमाचा ओलावा वाढवण्यासाठी एखादा सुंदर संदेश, आठवणींना उजाळा देणारे दोन शब्द किंवा मनापासून दिलेली शुभेच्छा नात्यातील गोडवा आणखी वाढवू शकते. यानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत काही खास, भावस्पर्शी आणि मनाला भिडणाऱ्या शुभेच्छा संदेशांचा खजिना..भाऊबीजेच्या या खास दिवशी आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही घेऊन आलो आहोत खास मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक HD ग्रीटिंग कार्ड्स! हे संदेश आणि कार्ड्स सेव्ह करा आणि WhatsApp, Facebook, Instagram वर शेअर करून आपल्या प्रियजनांना भाऊबीजेच्या शुभेच्छा द्या!

भाऊबीज शुभेच्छा संदेश...Bhaubeej 2026 wishes in marathi

सोनेरी प्रकाशात पहाट झाली

आनंदाची उधळण करत भाऊबीज आली

    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

    भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे आयुष्यभराची अनमोल साथ, 

    कितीही दूर असलो तरी मनाने 

    नेहमी जवळ असण्याची गोड भावना! 

    आपल्या नात्यातील प्रेम असंच कायम राहो. 

    भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

    नाते भाऊ-बहिणीचे,

    बंध प्रेमाच्या गाठीचे,

    साथ लाभो जन्मोजन्मी,

    नाते खुलो आनंदाच्या क्षणी!

    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

    नातं आपलं शब्दांत कधी मांडता येणार नाही,

    तुझ्याविना माझं बालपणही पूर्ण होणार नाही…

    तुझ्या चेहऱ्यावर हास्य सदैव फुलत राहो,

    आयुष्यभर सुखाची सावली तुझ्यासोबत राहो!

    भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

    भाऊबीजेचा दिवस आला, प्रेमाचा संदेश घेऊन आला

    भाऊबहिणीच्या नात्याने केली पुन्हा प्रेमाची उधळण

    महालक्ष्मी आणि यमराजाचेही आहे वरदान

    भाऊबहिणीचे हे बंधन राहो सदा महान

    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

    भावाविना बहीण अपूर्ण, बहिणीशिवाय भाऊ एकटा

    सूर्य आणि चंद्रासारखे नाते जणू

    भाऊबीजेच्या पवित्र दिनी हिची प्रार्थना करू

    दुःख दूर लोटून, आपण सदैव खूश राहू

    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

    नातं आपलं खास,

    प्रेमाचा सुंदर सहवास,

    संकटात साथ मिळो,

    आयुष्य आनंदी होवो,

    भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

    कधी गोड भांडणं, कधी रूसवे-फुगवे, 

    तर कधी एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकण्याची तयारी... 

    हेच तर आपल्या नात्याचं सौंदर्य आहे. 

    भाऊबीजच्या मंगलमय शुभेच्छा!

    माझ्या प्रत्येक संकटात साथ देणारा 

    आणि आनंदात सहभागी होणारा 

    माझा भाऊ नेहमी सुखी, समाधानी आणि निरोगी राहो. 

    भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा

    कधी रुसवा, कधी फुगवा, कधी गोड भांडणं,

    तरीही मनात जपलेलं प्रेमाचं नातं…

    अशीच राहो आपली साथ जन्मोजन्मी,

    माझ्या भावाला लाभो आनंद प्रत्येक क्षणी!

    भाऊबीजेच्या शुभेच्छा!