जेएनएन, मुंबई. Independence Day 2024: संपूर्ण देशभरात 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. 15 ऑगस्त 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. या दिवशी ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतांचे आयोजन केले जाते. स्वातंत्र्य लढ्यातील वीर सैनिकांना या दिवशी आदरांजली वाहिल्या जाते. राष्ट्रीयसण उत्साहात साजरा करण्यात नागरिकांना आणखी जोश येतो तो म्हणजे देशभक्तीपार गीतांमुळे देशभक्ती वर गेले गेलेले हे गीत कोणते जाणून घेऊया.
ये देश है वीर जवानों का
मोहम्मद रफी आणि एस. बलबीर यांनी गायलेले "ये देश है वीर जवानों का" हे गीत हे देशातील सर्वात सुंदर देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटातील या गाण्याचे गीतकार साहिर लुधियानवी असून या गाण्याचे संगीत ओंकार प्रसाद नय्यर यांनी दिले आहे. हे गीत दिग्गज दिलीप कुमार, अजित, या गाण्यात वैजयंतीमाला जी, चांद उस्मानी आणि जीवन या कलाकारांवर चित्रित आहे.
संदेसे आते है
वर्ष 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर चित्रपटातील लोकप्रिय गीत आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेले हे गीत अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले असून, लोकप्रिय गायक सोनू निगम आणि कुमार राठोड यांनी गायले आहे. हे गीत सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, तब्बू, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा आणि राखी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
ऐ मेरे वतन के लोगो
देशभक्तीपर गीतांमध्ये भारतातील सर्वात आवडते गाणे, "ऐ मेरे वतन के लोगो," हे गीत आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी हे गीत गेले असून, कवी प्रदीप यांनी या गीताचे बोल लिहिले आहे. 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे गीत गेले होते. लताजींनी गायलेले हे गीत ऐकून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील भावुक झाल्याच्या आठवणी सांगितल्या जातात.
आय लव्ह माय इंडिया
हे गीत 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटातली असून, लोकप्रिय देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे. कविता कृष्णमूर्ती, हरिहरन आणि उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण यांनी हे गीत गेले आहे. तर प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी "नदीम-श्रवण" यांनी या गीताला संगीत दिले आहे. परदेस या चित्रपटातली हे गीत अमरीश पुरी, शाहरुख खान, महिमा चौधरी, आलोक नाथ, अपूर्व अग्निहोत्री, हिमानी शिवपुरी आणि आदित्य नारायण यांचावर चित्रित करण्यात आले आहे.
रंग दे बसंती
हे गीत 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या "रंग दे बसंती" चित्रपटातील असून, या चित्रपटात आमिर खान, सोहा अली खान, आर. माधवन, शर्मन जोशी, कुणाल कपूर आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसून जोशी आणि ब्लेझ (रॅपर) यांनी हे अप्रतिम मजेदार गाणे लिहिले आहे. दलेर मेहंदी आणि चित्रा या प्रसिद्ध गायकांनी हे गीत गायले आहे.
मेरा रंग दे बसंती चोला
स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य नायक "भगतसिंग" यांच्या जीवनावर आधारित "शहीद" हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओलने मुख्य भूमिका साकारली आहे. शहीद चित्रपटातील मेरा रंग दे बसंती चोला हे गीत देशभक्तीपर गीतांच्या यादीत समाविष्ट आहे. उदित नारायण आणि भूपिंदर सिंग यांनी हे गीत गेले असून, आनंद राज आनंद यांनी या गीताला संगीत दिले आहे.
ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू
हे गीत 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राझी चित्रपटातील लोकप्रिय गीत आहे. 'ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू' हे गीत दिग्गज गीतकार गुलजार यांनी लिहिले असून, प्रसिद्ध संगीतकार शंकर- एहसान- लॉय यांनी संगीतबद्ध केले होते. हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायले असून, नंतर या गीताचे मेल व्हर्जन देखील प्रसिद्ध झाले हे अरिजित सिंगने गायले आहे.
तेरी माटी में मिल जावा
हे गीत 2019 केसरी चित्रपटातील आहे. अक्षय कुमारवर हे गीत चित्रित करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी हे गीत लिहिले आहे.
सुनो गौर से दुनिया वालो
हे गीत शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, उदित नारायण आणि डॉमिनिक सेरेजो प्रसिद्ध गायकांनी गेले आहे. हे गीत प्रसिद्ध लेखक समीर यांनी लिहिले असून, शंकर-एहसान-लॉय यांनी या गीताला संगीत दिले आहे. या गाण्यात सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि रवीना टंडन या बॉलीवूड इंडस्ट्रीतील टॉप स्टार्स आहेत.
मेरे देश की धरती
हे गीत 1967 रोजी प्रदर्शित झालेल्या "मेरे देश की धरती" हे गीत उपकार या चित्रपटातील आहे. या गाण्यात मनोज कुमार या नावाने ओळखले जाणारे दिग्गज हरिकृष्ण गोस्वामी यांचे चित्रण करण्यात आले आहे. गायक महेंद्र कपूर यांना राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले असून, लेखक गुलशन कुमार मेहता यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
