जेएनएन, नवी दिल्ली. How To Make Diwali Utane: दिवाळीसाठी उटणे हा आपल्या घरातील अविभाज्य भाग ठरतो. विविध दुकानांमधून उटणे विकत घेतले जाते. मात्र, यंदा आपण घरीच उटणे कसे तयार करावे, याविषयमी माहिती घेणार आहेत. उटणे हे आपल्या त्वचेला अधिक चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

उटण्यासाठी लागणारे साहित्य: 

  • 1/2 वाटी चणा डाळीचे पीठ (बेसन)
  • 1/2 वाटी मसूर डाळीचे पीठ
  • मुलतानी माती, 
  • चंदन पावडर, 
  • सुगंधी कचोरा, 
  • आवळा पावडर, 
  • वाला, 
  • अनंतमूळ, 
  • गुलाब पावडर, 
  • आंबेहळद 
  • नागरमोथा पावडर
  • दूध, 
  • गुलाबपाणी किंवा पाणी 

उटणे कसे बनवावे? (Diwali Utane Recipe)

  1. प्रथम चणा डाळ आणि मसूर डाळ वगळता, इतर सर्व सुगंधी पावडर एकत्र मिसळून नीट चाळून घ्या.
  2. या मिश्रणात चणा डाळीचे आणि मसूर डाळीचे पीठ चांगले एकत्र करुन घ्या.
  3. तयार झालेले सुगंधी उटणे एका कोरड्या आणि हवा बंद डब्यात भरून ठेवा. 
  4. अंगाला लावण्यासाठी आवश्यकतेनुसार थोडे उटणे घेऊन त्यात दूध, गुलाबपाणी किंवा साधे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. हवे असल्यास त्यात थेंबभर तिळाचे तेलही टाकू शकता.
  5. उटणे तयार झाल्यावर अंगाला लावा. आणि नंतर 5 ते 10 मिनिटांनी व्यवस्थित धुवा. त्वचेवरील टॅन त्वरीत जाण्यास मदत मिळते आणि हे तयार करणे अगदी सोपे आहे.

उटणे लावण्याचे फायदे (Benefits of Utane)

  • त्वचा स्वच्छ आणि टवटवीत राहते
  • काळवंडलेली किंवा टॅन झालेली त्वचा उजळण्यास मदत होते.
  • त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला थंडावा मिळतो.
  • त्वचेवरील काळे डाग व संसर्ग कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
  • उटणे लावल्यावर त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. 

हेही वाचा - Homemade Utane: अवघ्या 4 साहित्यांत घरच्या घरी तयार करा नैसर्गिक उटणे; जाणून घ्या बनवण्याची सोपी कृती आणि त्वचेसाठी फायदे