जेएनएन, मुंबई. Teacher’s Day 2025: आज (5 सप्टेंबर) देशभरात शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून पाळला जातो.

या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना कृतज्ञतेची भेट, शुभेच्छा आणि सन्मान दिला जातो. अनेक शाळा-कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि शिक्षक सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करत, "शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार आहे" हा संदेश यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

"गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय प्रगती नाही" – या भावनेने देशभर आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. या शुभेच्छा संदेशासह तुम्ही तुमच्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

  • ज्ञानरूपी दीप लावून आयुष्य उजळवणाऱ्या गुरुजनांना माझा मानाचा मुजरा… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
  •  विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कार, ज्ञान आणि प्रेरणेची बीजे पेरणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
  •  गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे… तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला मिळतेय योग्य दिशा… शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  •  जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या गुरुजनांमुळेच विद्यार्थी उज्ज्वल होतात… त्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  •  आमच्यासाठी वेळ, परिश्रम आणि संयम देणाऱ्या सर्व प्रिय शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम… शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! 

हेही वाचा:Teacher’s Day 2025:  जगात 5 ऑक्टोबर पण भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो?