जेएनएन, मुंबई. Happy New Year 2026: जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे देशभरात उत्साहात स्वागत केले जाते. मध्यरात्रीपासूनच घरोघरी, चौकाचौकांत आणि सार्वजनिक ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तसेच फोन, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.

मंदिरे, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांवर विशेष प्रार्थना व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनेक जण नवीन वर्षाच्या निमित्ताने नवे संकल्प करत सकारात्मक सुरुवात करतात. या नवीन वर्षाच्या सुरवातीला तुम्ही देखील तुमच्या प्रियजनना नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश पाठवत हे वर्ष आनंदाने साजरे करू शकता. 

 नवीन वर्षाच्या शुभेच्छा 

  • नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
    नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येवो.
    प्रत्येक दिवस नवी उमेद, नवी संधी आणि नवे हास्य देणारा ठरो.
  • नवीन वर्ष २०२६ च्या शुभेच्छा!
    जुनी दुःखे मागे पडोत,
    नव्या स्वप्नांना पंख लाभोत,
    आयुष्य सुख-समृद्धीने बहरून जावो.
  • नवीन वर्षाच्या प्रेमळ शुभेच्छा!
    तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो,
    घरात आनंद आणि मनात शांती नांदो,
    हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खास ठरो.
  • नवीन वर्ष, नवी सुरुवात!
    स्वप्नांना दिशा मिळो,
    कष्टांना फळ मिळो,
    आणि आयुष्य अधिक सुंदर बनो.
  • नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
    नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात
    नवी स्वप्ने, नवे यश आणि नवा उत्साह घेऊन येवो.
    प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो.
  • नवीन वर्ष – नवी आशा!
    दुःख मागे राहो,
    सुख पुढे येवो,
    आयुष्य प्रत्येक क्षणी बहरून जावो.
  • नवीन वर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!
    आरोग्य, समृद्धी आणि समाधान
    तुमच्या पावलोपावली साथ देवो.
    हे वर्ष तुमच्यासाठी यशस्वी ठरो.
  • हसरे चेहरे, आनंदी क्षण,
    यशाने भरलेले दिवस
    आणि समाधानाने भरलेले आयुष्य
    हेच नवीन वर्ष तुम्हाला देवो.
    नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
  • नवीन वर्ष – नवे संकल्प!
    स्वतःवर विश्वास ठेवा,
    स्वप्नांचा पाठलाग करा,
    हे वर्ष तुमच्या यशाची सुरुवात ठरो.
  • आनंद, प्रेम आणि समाधान
    तुमच्या आयुष्यात कायम नांदो.
    नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखद ठरो!