जेएनएन, मुंबई: सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा मकर संक्रांती सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच नागरिकांनी स्नान, पूजन करून सणाची सुरुवात केली. घराघरांत तिळगुळ, गुळपोळी, पुरणपोळी तयार करण्यात आली, तर एकमेकांना “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत शुभेच्छा दिल्या जातात.

ग्रामीण भागात हुरड्याचा खास आस्वाद घेत सण साजरा करण्यात आला. शेतशिवारात हिरव्या ज्वारीच्या कणसांचा हुरडा खाण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. शेतीशी निगडित हा सण असल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असते. तर शहरी भागात पतंग उडवण्याचा उत्साह दिसतो. अश्या या शुभ दिनी एकमेकांना शभेच्छा संदेश पाठवून मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित करू या. 

  • तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

सूर्यदेवाच्या कृपेने

तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो

मकर संक्रांती 2026 च्या हार्दिक शुभेच्छा!

  • सूर्य उत्तरायणास येतो

नव्या आशा, नवे स्वप्न घेऊन येतो

    तुमच्या आयुष्यातही

    समृद्धीचे, आनंदाचे उत्तरायण घडो

    मकर संक्रांती 2026 च्या शुभेच्छा!

    • तिळगुळासारखे गोड क्षण

    आणि पतंगासारखी उंच भरारी

    तुमच्या आयुष्यात नित्य नांदो

    मकर संक्रांती 2026 च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    • जुने दुःख मागे टाकून

    नव्या आशा स्वीकारण्याचा सण

    तुमच्या जीवनात आनंद, यश आणि शांतता घेऊन येवो

    मकर संक्रांती 2026 च्या हार्दिक शुभेच्छा!

    • उत्तरायणाचा सण मकर संक्रांती

    तिळगुळ, पतंग आणि आनंदाची उधळण

    राज्यभर उत्साहाचे वातावरण

    मकर संक्रांती 2026 च्या शुभेच्छा!

    • तिळगुळ खा, गोड बोला,

    पतंग उडवा आणि दिवस गोड बनवा!

    हॅपी मकर संक्रांती 2026!

    • सूर्याची किरणं, हुरड्याचा गोडवा,

    पतंगांची उंच भरारी आणि गोड तिळगुळ,

    सर्व तुमच्यासाठी!