जेएनएन, मुंबई. Happy Bhogi Sankranti Wishes 2026:  भोगी हा सण शेतीशी निगडित असून नवीन पिकांच्या स्वागताचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करण्याचा दिवस मानला जातो. ग्रामीण भागात भोगीला विशेष महत्त्व असून अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी इंद्रदेवाची पूजा करून चांगल्या पावसासाठी व भरघोस पीक येण्यासाठी प्रार्थना केली.

भोगीच्या अग्नीत जुने दुःख, नकारात्मकता आणि अडचणी जळून जावोत, तर नव्या आनंद, आरोग्य व समृद्धीचे आगमन व्हावे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. जुने जाळा… नवे स्वप्नं उभारा हा संदेश देणारा भोगी सण समाजात सकारात्मकतेची नवी उर्जा निर्माण करतो.

  • भोगीच्या पावन दिवशी घराघरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम नांदावे, या शुभेच्छांसह नागरिकांनी एकमेकांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  • भोगीच्या अग्नीत जुने दुःख, नकारात्मकता व अडचणी जळून जावोत आणि नव्या आनंद, आरोग्य व समृद्धीचे स्वागत होवो.  भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
  •  जुने सोडून नवे स्वीकारण्याचा संदेश देणाऱ्या भोगी सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा
  • भोगीच्या पावन दिवशी तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम नांदो.
    सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • जुने जाळा… नवे स्वप्नं उभारा!
    भोगीच्या शुभेच्छा
  • भोगीचा अग्नी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेचे दहन करून यश व आनंद घेऊन येवो.
    भोगीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    हेही वाचा: Makar Sankranti 2026: हळदी-कुंकू आणि बोरन्हाणावर अमावस्येची छाया; यंदा फक्त चार दिवसच हळदी-कुंकू