जेएनएन, नवी दिल्ली. Independence Day 2025 Wishes : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणाऱ्या स्वातंत्र्य दिन निमित्त  राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी ध्वजवंदन करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतील.

शाळा, महाविद्यालये, सरकारी व खासगी संस्थांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देशाच्या सीमांवर तैनात जवानांनीही राष्ट्रध्वज फडकावून मातृभूमीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली जाईल. नागरिकांनी घराघरावर तिरंगा फडकावत देशभक्तीचे वातावरण निर्माण करतात.

स्वातंत्र्य दिन हा केवळ ऐतिहासिक दिवस नसून देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृती जागवणारा आणि भविष्याची नवी दिशा ठरवणारा दिवस जाणीव या दिवशी केली जाते. देश आपला ७९वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना तुम्ही तुमच्या प्रियजनांना या शुभेच्छा संदेशाद्वारे स्वातंत्र्य दिनच्या शुभेच्छा  देऊ शकता. 

  • "स्वातंत्र्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती, आणि एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. या दोन्हींचे जतन करूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!"

  • "शूरवीरांच्या बलिदानाने मिळालेलं हे स्वातंत्र्य सदैव जपुया, देशप्रेमाने मन सजवूया. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 
  • "भारताच्या प्रत्येक श्वासात स्वातंत्र्याची सुगंध आहे. त्या सुगंधाचा अभिमान बाळगूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!" 
  • "देशभक्ती ही फक्त भावना नाही, ती आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीची आठवण ठेवूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!" 
  • "आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माती – ह्याच आपली खरी ओळख. या ओळखीचा अभिमान बाळगूया. जय हिंद!" 
  • "शूर सैनिकांच्या बलिदानाने फुललेला स्वातंत्र्याचा हा वटवृक्ष आपण एकतेने व प्रगतीने सदैव हिरवा ठेवूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!"
  • "स्वातंत्र्याची खरी किंमत जाणून त्याचे जतन करणे हीच शूरवीरांना खरी आदरांजली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 
  • "आजचा दिवस आहे आपल्या मातीच्या सुगंधाचा, आपल्या संस्कृतीच्या गौरवाचा आणि आपल्या भारताच्या अभिमानाचा. जय हिंद!" 
  • "आपले स्वातंत्र्य हे फक्त एक भेट नव्हे, ते अनेकांच्या त्यागाचे फळ आहे. त्याचा सन्मान राखूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!"