जेएनएन, मुंबई. Dr Babasaheb Ambedkar Jayanti: संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14  एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व भीमाबाई यांचे 14 वे शेवटचे पुत्र होते. अस्पुश्य म्हणून जन्माला आलेल्या भीमराव आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनके कठीण प्रसंगाचा सामना करावा  लागला होता.

भारतात धर्म, जात-पात या सर्वांना मानणारा मोठा वर्ग होता. अस्पृश्य म्हणजेच खालच्या जातीतील (महार, मांग इत्यादी ) नागरिकांना कायम हीन भावनेने बघितले जायचे. अस्पृश्य जातीतील नागरिकांना इतर नागरिकांसारखे अधिकार नव्हते. त्यांना इतरांसोबत बसण्याचा, काम करण्यापासून रोखले जायचे. त्या काळातील या भेदभावामुळेच बाबासाहेबांना शिक्षण घेताना अनके संकटांना सामोरे जावे लागले. अश्या कठीण परिस्थिती त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व भारताचे संविधान लिहिलण्याचा मान मिळवला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरच आज भारताची अर्थव्यस्था चालू आहे. आज14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची आज 133 वी जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महत्वपूर्ण 10  कार्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1924 मध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी पीडित- शोषित असलेल्या नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी एक संघटना सुरू केली. या संघटनेचा उद्देश शिक्षणाचा प्रसार करणे, आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि निराश वर्गाच्या तक्रारींचे प्रतिनिधित्व करणे हे होते. या संघटनेच्या माध्यमातून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील नागरिकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे व त्यांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत झाली. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी नवीन सुधारणांच्या संदर्भात पीडित- शोषित वर्गाच्या समस्यांमागची कारणे शोधून त्यांचे  निराकरण करण्यासाठी  ‘बहिष्कृत भारत’  हे वृत्तपत्र सुरू केले.
  • नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पीडित- शोषित वर्गाची प्रांतीय परिषद 13 ऑक्टोबर 1935 रोजी झाली. या परिषदेत त्यांनी "मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" ही  घोषणा करून हिंदूंना हादरा दिला. बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. व 1936 मध्ये त्यांनी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’  महार परिषदेला मार्गदर्शन करत  हिंदू धर्माच्या त्यागाचा पुरस्कार केला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी पीडित- शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. या ‘स्वतंत्र मजूर पक्षात’ कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
  • भारतात पार पडलेल्या  गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत 1942 मध्ये त्यांनी कामगार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1946 मध्ये ते बंगालमधून संविधान सभेवर निवडून आले. त्याच वेळी त्यांनी ‘शुद्र कोण होते? (Who were Shudras?)’ हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
  • 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर  नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांची कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती झाली. 1951 मध्ये मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न, भारताचे परराष्ट्र धोरण आणि हिंदू कोड बिल याबाबत नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
  • कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये त्यांना भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामधील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून LL.D ची पदवी बहाल केली. 1955 मध्ये त्यांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
  • उस्मानिया विद्यापीठाने 12 जानेवारी 1953 रोजी बाबासाहेबांना  डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली.
  •  नेपाळ येथील काठमांडू इथे 1954 मध्ये झालेल्या "जागतिक बौद्ध धर्म परिषदेत", बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते ह्यात असताना "बोधिसत्व" ही पदवी प्रदान केली होती.
  •  रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनसमोर मांडलेल्या संकल्पनेवर मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली होती.