संदीप राजवाडे, नवी दिल्ली: नुकतेच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गमध्ये छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण तापले आहे. पुतळा पडणे हा भावनिक स्वरूपात तेथील प्रत्येक व्यक्तीच्या आस्थेला एक प्रकारचा धक्का आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छ. शिवाजींच्या नावानेच पूढे चालले आहे.
त्यांच्यातील शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द, त्यांच्या निर्वाणानंतर देखील आजही लोकांना प्रेरित करते. एवढेच नव्हे तर इतिहासकार आणि त्यांचे वंशज यांचे देखील म्हणणे आहे की, छ. शिवाजींच्या विचारसरणी ने भारताच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे, त्यांच्या विचारांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना प्रेरित केले, त्यांच्या शौर्याचे पोवाडे ऐकवून लोकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्राचे राजकारण हे कधीही छ. शिवाजी महाराजांशिवाय नव्हते आणि पुढे कधी असणार नाही. महाराष्ट्राच्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी हे आस्थेचे केंद्र आहे, त्यांच्याशी ते भावनात्मकरीत्या जोडले गेले आहेत. आज या लेखात आपण छ. शिवाजी महाराजांच्या आधीच्या महाराष्ट्रापासून ते वर्तमानातील महाराष्ट्रापर्यंत जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या दोन गाद्या आहेत. पहिली गादी साताऱ्याची आहे, ज्यावर छ. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले विराजमान आहेत. दुसरी गादी कोल्हापूर (करवीर) यांची आहे, जिथे छ. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांचे 12 वे वंशज श्रीमंत शाहू शाहजी महाराज छत्रपती विराजमान आहेत, जे सध्या कोल्हापूरचे खासदार आहेत.
शाहू शाहजी छत्रपती यांनी मराठी जागरणशी बोलतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना स्वातंत्र्याचा मंत्र देऊन लढण्याची प्रेरणा दिली. आज देखील महाराष्ट्रातील प्रत्येक मूल यांची प्रेरणा घेऊनच मोठे होते. ते महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत आणि नेहमीच असतील.

छ. शिवाजीवर ज्यांनी 14 पुस्तके लिहिली आहेत ते कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, छ. शिवाजी महाराज हे येथील शेतकऱ्यांचे राजे होते. शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी खूप काही केले. मागासवर्गीयांसाठी त्यांनी सतत काम केले आहे. शेतकरी, शेती आणि महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. पूर्वी शेतकरी त्या भागात वतनदाराच्या हाताखाली काम करत असत (त्यावेळी महाराष्ट्रात जमीन मालकांना ही पदवी दिली जात होती). तिथे वतनदारांचे राज्य होते. छ. शिवाजीने वतनदारी पद्धती बंद करून राजा आणि शेतकरी यांना जोडण्याचे काम केले. त्यांची राज्यसत्ता थेट शेतकऱ्यांशी जोडली गेली. त्यामुळे लोक त्याच्याशी जोडले जाऊ लागले. छ. शिवाजी आणि सामान्य लोक यांच्यामध्ये कोणीच नव्हते, त्यांच्यात थेट संवाद होता. त्यामुळे त्या काळात आणि आजही महाराष्ट्रातील जनतेला ही ओढ केवळ त्यामुळेच आहे असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्रातील लोक छ. शिवाजी महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून लढाईत सामील झाले होते. याच आत्मीयतेमुळे आज महाराष्ट्रातील जनतेसाठी छ. शिवाजी हे देवासमान आहे. छ. शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात प्रेरणा उत्पन्न केली की आम्ही सर्व तर येथील रहिवासी आहोत, भूमिपुत्र आहोत, इथे राज्य करण्यासाठी सक्षम आहोत आणि जे बाहेरचे लोक येथे राज्य करण्यासाठी आले आहेत, त्यांचे राज्य येथे चालणार नाही. याच भावनेने स्वातंत्र्य संग्रामाची लढाई लढली गेली. म्हणूनच त्यांनी आपल्या राज्याला स्वराज्य म्हटले. त्यांनी भोसलेंचे राज्य असे नाही म्हटले. याचा अर्थ होता आमचे राज्य. स्वतःचे राज्य म्हटले होते. आपण जर याच भावनेने वागलो तर ते भविष्यासाठी चांगले राहील.

इतिहासकार इंद्रजीत सांगतात की महाराष्ट्राचे राजकारण छ. शिवाजी महाराजांशिवाय कधीच चालू शकत नाही. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याच नावाने उभा केला होता. त्यांचे नावचं लोकांना आकर्षित करीत होते, त्यामुळे लोकांमध्ये आपण त्यांच्याशी जोडले आहोत ही भावना होती. पक्ष कोणताही असो, तो छ. शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात चालू शकत नाही. लोकांच्या मनाशी आणि आस्थेशी छ. शिवाजी महाराज जोडले गेले आहेत.

मुंबईच्या इतिहास संकलन समिति, कोंकण प्रांताचे सहसचिव प्रशांत रावदेव यांनी सांगितले की, छ. शिवाजी हे केवळ एक नाव नसून महाराष्ट्राच्या लोकांसाठी शौर्य, प्रेरणा आणि आस्थेचे प्रतीक आहे. त्यांचेद्वारे आजपासून कित्येक वर्ष आधी केलेले कार्य आणि शौर्याची लढाई आज देखील लोकांना प्रेरित करते. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. इतिहासाच्या अशा अनेक घटना आहेत ज्यात सांगितले गेले आहे की, छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची कल्पना केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात पसरवली. आपल्या राज्यात आपल्या लोकांचा राजा असायला हवा, कुणी बाहेरची व्यक्ती इथे राज्य करू शकत नाही, हा विचार लोकांमध्ये बिंबवून त्यांना कुणापुढेही न वाकण्यासाठी प्रेरित केले आणि लढण्याचे बळ दिले. अनेक घटनांमधून त्याच्या शौर्याची उदाहरणे पहायला मिळतात. आजही लोकांना त्याच्याशी जोडलेले वाटते. त्यांच्यासाठी छ. शिवाजी म्हणजे देव आहे. ते भावनात्मकरीत्या त्यांच्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात आस्था आहे. आपण आजचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे राजकारण असो किंवा अन्य कोणताही मुद्दा असो, छ. शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि नावानेच चालतात. आता त्याचे पालन अथवा अनुकरण किती राजकीय पक्ष करतात, हा वेगळा विषय आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या काळापासून ते वर्तमान काळापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांची एक अमिट छाप होती
- महाराष्ट्रावर वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, अभिर, सेंद्रक, कलचुरी, कदम, निकुंभ आणि शेवटी यादव वंशजांनी राज्य केले. यादव वंशजांची राजधानी देवगिरी किल्ल्यावर होती. इसवी सन 1318 मध्ये मुबारक खान खिलजीने यादवांचे समाज संपवले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 350 वर्षे सत्ता मुघलांच्या हातात राहिली.
- छ. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्राचे अधिकांश क्षेत्र अहमदनगरचा निजाम आणि विजापूरचा आदिलशहा यांचा ताब्यात होते. महाराष्ट्राचा काही भूभाग मुघल, काही भूभाग आदिलशाह, काही भूभाग निजामशाह आणि काही भूभाग कुतुबशाहच्या ताब्यात होता.
- छ. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी दोन वेळा अदिलशाहशी विद्रोह करून स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना अपयश आले.
- त्यांनी छ. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात ठेवले आणि ते स्वतः बंगलोरला निघून गेले. महाराष्ट्र सह्याद्री पर्वतांनी वेढलेला होता आणि तिथे दाट जंगले होती. त्याच्या सहाय्याने कोणत्याही शत्रूला तिथे मात देता येत होती. शहाजीराजांनी छ. शिवाजीसोबत चांगल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे मंत्रिमंडळ नेमून दिले होते.
- छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यात न्यायाची व्यवस्था केली. शेतीसाठी शेतकऱ्यांना मदतीची उचित व्यवस्था केली. बादशहा आणि सुलतान यांचा जुलूम बंद झाला.
- मराठा नौदलाची स्थापना केली. छ. शिवाजी महाराजांना याची जाणीव होती की ज्याच्याकडे नौदल आहे तोच समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो. सिद्दीच्या आक्रमणापासून आपल्या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी, समुद्री व्यापार आणि सीमा शुल्क यापासून मिळणारा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी, आणि व्यापारी जहाजे आणि बंदरांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी नौदलाची स्थापना केली. यामध्ये गुरब, गलबत आणि पाल या युद्धनौकांचा समावेश होता.
- स्वराज्यावर पहिले आक्रमण आदिलशाहने केले 1648 मध्ये त्याने छ. शिवाजी महाराजांच्या छोट्याशा सैन्यावर हल्ला केला. त्यादरम्यात असे वाटत होते की आदिलशहाच्या फौजेला हरवणे अशक्य आहे. परंतु त्यावेळी छ. शिवाजीच्या सैन्याने त्याला हरवले. आदिलशाहने दुसरी स्वारी 1659 मध्ये केली, त्याने आपल्या खास अफजल खानसोबत 22 हजाराची फौज पाठवली. अफजल खान अतिशय ताकदवान होता. अफजल खानचे खरे नाव अब्दुल्ला भटारी होते. उंच आणि आडवी अंगकाठी असलेला अफझलखान हा विजापूरचा नवाब आदिल शाह आणि मोठी राणी यांचा उजवा हात होता. सन 1656 मध्ये जेंव्हा विजापूरवर औरंगजेबच्या सैन्याने स्वारी केली तेव्हा अफजल खानने त्यात विजय मिळवला. त्याने अनेक लढाया जिंकल्या होत्या. प्रचंड फौज घेऊन आलेल्या अफजलला छ. शिवाजी महाराजांनी चतुराईने महाबळेश्वरच्या दाट जंगलात बोलवले आणि त्याचा खात्मा केला, त्याचा प्रभाव संपूर्ण हिंदुस्थानभर पसरला.

- त्यानंतर आदिल शाहने आणखीन एक स्वारी केली होती. छ. शिवाजी महाराजांना वेढा देत सिद्दी जौहर पन्हाळगडला आला. पन्हाळगडावर छ. शिवाजी महाराजांना चार महिन्यांपर्यंत वेढा देऊन ठेवला. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत चर्चा करून एक साहसी व्यूह रचना तयार केली. यादरम्यान शत्रूसमोर शरण येण्याचे स्वप्न दाखवले गेले आणि दुसऱ्या पद्धतीने ते आपल्या सहाशे सैनिकांसह गुप्त मार्गाने विशाळगडाला निघून गेले.
- यानंतर औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान 90 हजारांची फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आला. त्याआधी औरंगजेबने शाहिस्ते खानला दक्खनचा व्हॉईसरॉय म्हणून नियुक्त केले होते आणि त्याला छ. शिवाजी महाराजांच्या क्षेत्रांवर आक्रमण करायला सांगितले होते. शाहिस्ते खानने फेब्रुवारी 1660 मध्ये अहमदनगर सोडले आणि एप्रिल 1660 मध्ये पुण्याला पोहोचला. त्याने रसद मिळवण्यासाठी चाकणचा किल्ला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आणि मुघलांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. शाहिस्ते खानने स्वराज्याचे क्षेत्र पुणे सुभ्यावर ताबा मिळवला. त्याने पुण्यातील लाल महालात आपले बस्थान बसवले. मुघलांच्या सेनेने पुण्याच्या आसपासची क्षेत्रे उध्वस्त करणे सुरु केले.
- छ. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना उत्तर कोकणचे रक्षण करण्यासाठी पाठवले आणि स्वतः दक्षिणेकडे निघून गेले आणि दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर, राजापुर, पलवनी आणि श्रृंगारपुर यावर कब्जा केला. शाहिस्ते खान 3 वर्ष पुण्यातच राहिला. त्याचा प्रतिकूल प्रभाव लोकांवर पडत होता. शाहिस्तेखानला पुण्याच्या बाहेर पिटाळून लावण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी एक धाडसी योजना आखली. 5 एप्रिल 1665 रोजी छ. शिवाजी महाराजांनी आपल्या केवळ 300 सैनिकांसह लाल महालावर हल्ला चढवला. या हल्ल्यात शाहिस्ते खानाचा मृत्यू होऊ शकला नाही परंतु छ. शिवाजीने त्याची तीन बोटे कापून टाकली. त्यानंतर तो तीन दिवसांच्या आतच पुणे सोडून पळून गेला.
- तीन वर्ष पुण्यात राहण्यादरम्यान शाहिस्तेखानाने स्वराज्याची क्षेत्रे उध्वस्त करून टाकली होती. या नुकसान भरपाईसाठी सुरतच्या पश्चिमी किनाऱ्यावर मुघल साम्राज्याचे एक सर्वात श्रीमंत आणि समृद्ध बंदर होते. युरोपियन म्हणजे ब्रिटिश, डच आणि फ्रांसीसी लोकांचे तिथे कारखाने होते. छ. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला करण्याची योजना आखली. सुरतचा सुभेदार मराठ्यांचा काहीच प्रतिकार करू शकला नाही. छ. शिवाजी महाराजांनी सुरतमधून भरपूर धन प्राप्त केले. सुरत अभियान हे बादशहा औरंगजेबसाठी एक मोठा धक्का होता.

- औरंगजेबने छ. शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आग्रह केला आणि त्यांना धोका देऊन कैद करून टाकले. तीन महिन्यांनंतर छ. शिवाजी महाराज तिथून आपल्या 300 लोकांसोबत सुटका करून महाराष्ट्रात परत आले आणि 1674 मध्ये त्यांनी राज्याभिषेक केला.

- महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांना परमेश्वराचा अवतार मानले जाते. छ. शिवाजी महाराजांचा प्रभाव कसा होता? छ. शिवाजी महाराज गेल्यानंतर 27 वर्षे औरंगजेब महाराष्ट्रात होता. चार लाखांची फौज घेऊन आला होता, परंतु त्याचा इथे अंत झाला. परंतु तरी देखील तो मराठ्यांचे साम्राज्य संपवू शकला नाही. त्यानंतर देखील मराठ्यांनी संपूर्ण भारतभर दीड वर्षापर्यंत आपला रुबाब कायम राखला, आणि हे सगळं छ. शिवाजीच्या प्रेरणेने झाले.
- अहमदशाह अब्दाली 1761 मध्ये अफगाणिस्तानातून आला. त्याने दिल्लीवर स्वारी केली, परंतु मराठ्यांनी निघून पानिपतपर्यंत जाऊन अब्दालीला रोखले. त्याच्यासोबत युद्ध केले, त्यात एक लाख मराठे मारले गेले होते.
- मराठा स्वराज्य स्थापनेसाठी 30 वर्षांपेक्षा अधिक काळ संघर्ष करावा लागला. स्वराज्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी 6 जून 1674 रोजी छ. शिवाजी महाराजांचा काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांचे हस्ते रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला. महाराज स्वराज्याच्या गादीवर बसले. आता ते स्वराज्याचे छत्रपती बनले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून, छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या तारखेपासून एका नवीन युगाची सुरुवात केली.

- राज्याभिषेकानंतर छ. शिवाजी महाराजांनी गोव्याजवळ फोंडा किल्ल्यावर विजय मिळवला आणि 1675 मध्ये यावर कब्जा केला. नंतर मराठ्यांनी अंकोला आणि शिवेश्वर सोबत कोल्हापुरवर कब्जा केला.

- त्यानंतर छ. शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला दक्षिणेत पूर्व किनाऱ्यावर घेऊन जाण्याची आणि आदिलशाही कर्नाटक प्रांत जिंकण्याची योजना आखली. त्यांनी 1677 मध्ये कर्नाटक अभियानाचा श्रीगणेशा केला. आदिलशाहकडून त्याची रक्षा केली जाऊ शकली नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाहला भेटण्यासाठी गोळकोंडाला गेले. त्यांनी त्याच्यासोबत मैत्री करार केला.
- एप्रिल 1677 मध्ये ते आदिलशाही कर्नाटककडे जाण्यासाठी निघाले. छ. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांनी तंजावरमध्ये स्वतःसाठी एक राज्य निर्माण केले होते. कोलेरूनच्या उत्तर किनाऱ्यावर तिरुमलवाड़ीमध्ये व्यंकोजीची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत भेट झाली. छ. शिवाजी महाराजांनी व्यंकोजीला स्वराज्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना व्यंकोजीकडून उत्तर मिळाले नाही. नंतर महाराजांनी बंगलोर, कर्नाटकमध्ये होसकोटे, वेल्लोर सारखे आणखी काही किल्ले आणि आदिलशाही राज्याच्या काही भागांवर विजय प्राप्त केला.
- दक्षिणेतील कायमस्वरूपी विलयामुळे महाराजांची शक्ती वाढली आणि यामुळे भविष्यात औरंगजेबाच्या सैन्याचा प्रतिकार करण्यास मदत झाली.
- छ. शिवाजी महाराजांनी खंडेरी द्वीप मजबूत करण्याचा निश्चय केला, कारण ते मुंबईच्या जवळ स्थित होते आणि एका महत्वपूर्ण स्थानावर होते. त्यानंतर इंग्रजांनी द्वीपावर नियमित घेराव घालण्याचा निर्णय घेतला. या नौदल संघर्षात इंग्रजांना त्यांचा ताफा मागे घ्यावा लागला. यामुळे छ. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यातील नौदल संघर्ष संपुष्टात आला.
- काही महिन्यातच छ. शिवाजी महाराज आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा मृत्यू झाला.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात नाशिक, पुणे, सतारा, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमधील मोठे क्षेत्र होते. यामध्ये कर्नाटकचे बेळगाव, कारवार आणि धारवाड जिल्ह्यांमधील काही भाग आणि तमिलनाडु राज्याचे जिंजी, वेल्लोर आणि त्यांच्या आसपासचे क्षेत्र देखील समाविष्ट होते.
- त्यांनी स्वराज्याच्या प्रशासनासाठी एक कुशल आणि निश्चित प्रणाली स्थापन केली. प्रशासन आठ विभागांमध्ये विभाजित केले. प्रत्येक विभागाच्या प्रमुखांवर एक मंत्री नियुक्त केला गेला होता. त्यांच्या आठ मंत्र्यांच्या परिषदेला अष्ट-प्रधान मंडळ म्हणून ओळखले जात असे. छ. शिवाजी महाराजांनी शेतीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा अवलंब केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले. त्यांना व्यापाराच्या विकासाची आणि उद्योगांच्या सुरक्षिततेचीही तितकीच काळजी होती. अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर केले.
- बुंदेल राज्याची आधारशिला रोवणारे चंपतराय बुंदेलेंचे पुत्र महाराजा छत्रसाल 1671 मध्ये महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांना भेटायला आले. त्यांनी महाराजांना विनंती केली की मला तुमच्या सोबत घ्या, माझ्या सेवेचा स्वीकार करा. तेव्हा छ. शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटले, "छत्रसालजी आपण या क्षेत्राचे मुकुटमणी आहात आपण बुंदेलखंडला परत जा, आपली मातृभूमी जिंका, आपल्या देशावर राज्य करा. आम्ही तुमच्यापासून जराही वेगळे नाही, आपण सगळे एक आहोत. गाय, वेद आणि विद्या यांचे पालन करा. मी जर आपणास माझ्या सोबत घेतले तर नाव माझे होईल आणि तुमच्या वाट्याला काही येणार नाही. आणि आम्ही जर असे केले तर आमचा देश या तुर्कांपासून कधी मुक्त होईल? त्यानंतर छत्रसाल बुंदेलखंडला परत गेले आणि त्यांनी आपल्या मातृभूमीला तुर्कांपासून मुक्त केले.
- 1730 च्या आसपास महाराज छत्रसाल यांचेवर दिल्लीच्या बादशहाने आक्रमण केले आणि त्यांची मोठी हार झाली. त्यांच्याकडे थोडासाच भूभाग शिल्लक राहिला होता. त्यादरम्यान त्यांना छ. शिवाजी महाराजांची आठवण झाली, परंतु त्यावेळी छ. शिवाजी महाराज जिवंत नव्हते. त्यादरम्यान सत्ता पेशव्यांच्या हाती होती आणि गादीवर महाराजांचे नातू शाहू महाराज होते. छत्रसाल यांनी बाजीराव पेशव्यांना पात्र पाठवले आणि म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मला वाचन दिले होते की आम्ही एक आहोत. आता मला गरज आहे, तरी माझी मदत करावी. जेव्हा पत्र मिळाले तेव्हा बाजीराव पेशवे जेवत होते, ते जेवणावरून उठले आणि आपली फौज घेऊन तडक बुदेंलखंडला पोचले. छत्रसालजींची मदत केली आणि बुंदेलखंड मुक्त केले.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत छ. शिवाजी सतत प्रेरणा बनून प्रेरित करीत राहिले
1857 च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व देखील मराठ्यांनीच केले होते. 1857 नंतर महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठे बंड केले. ते मातंग समाजाचे होते आणि स्वतःला छ. शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणवून घेत असत. यानंतर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, त्यांनी देखील रामोशी समाजाला सोबत घेऊन इंग्रजांच्या विरोधात बंड केले. ते देखील छ. शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत असत. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा उत्सव सुरु केला. त्यानंतर वीर सावरकर यांनी छ. शिवाजी महाराजांची आरती लिहिली. ते देखील छ. शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत असत.

- छ. शिवाजी महाराजांचे राज्य लहान होते, परंतु त्यांचे लक्ष संपूर्ण देशावर होते. त्यांनी आसामातील बरफुकन, नेपाल नरेश, राजपूत, जाट यांना पत्र लिहिली होती आणि संपूर्ण हिंदुस्थान मुघल मुक्त करण्यासाठी एकत्र येण्याविषयी सांगितले होते.
- स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की जसे राम कथेचे आयोजन केले जाते तसेच शिवचरित्राच्या कथेचे आयोजन व्हायला हवे. सुभाष चंद्र बोस एकदा महाराष्ट्रात आले असता त्यांनी छ. शिवाजी महाराजांविषयी ऐकले. नंतर त्यांनी बंगालमध्ये जाऊन सांगितले की इतक्या महान व्यक्तीविषयी आतापर्यंत बंगालीमध्ये काहीच का लिहिले गेले नाही. आपल्याला काही लिहायला हवे आणि नंतर रवींद्रनाथ टागोर यांनी छ. शिवाजी महाराजांवर एक काव्य लिहिले.
- छ. शिवाजी महाराजांना अनेक लोक धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) म्हणत असत, परंतु तसे नव्हते. त्यांच्या राज्यात मशीद अथवा चर्च यांना अनुदान दिले जात नव्हते. त्यांनी नेताजी पालकर यांना हिंदू धर्मात परत आणले होते. त्यांनी गोव्याच्या सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्स्थास्थापना केली होती. हे मंदिर आधी आदिलशाह आणि नंतर पोर्तुगीजांनी पाडले होते. तामिळनाडूमधील समोत्तरा पेरुमल भगवानांची दोन मंदिरे पाडून मशीद बांधण्यात आली होती, नंतर दोन्ही मशिदी पाडून मंदिर बांधण्यात आले आणि शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.
- काशीचे गागाभट्ट जे मूळचे महाराष्ट्र आणि पैठणचे होते. त्यांचे आजोबा इथून काशीला गेले होते. त्यांच्याकडूनच हिंदू पद्धतीने छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यांनी आपल्या अष्टप्रधानांची नावेही संस्कृतमध्ये ठेवली होती. त्यांच्या स्वराज्याचे नाव हिंदवी स्वराज्य असे होते.
- ब्रिटिश राजवटीत काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी इंग्रज राजसत्तेला पाठवल्या गेलेल्या पत्रात लिहिलं होतं की, जर छ. शिवाजी महाराज नसते तर आपण शंभर वर्षांपूर्वी भारतावर कब्जा करू शकलो असतो.
- इंडियाफॅक्ट्स डॉ. ओआरजीमधील अनिष्ट गोखले यांच्या एका लेखात सांगितले गेले होते की, छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या आधीच देशवासियांसाठी एक राष्ट्रीय नायक बनले होते. पंजाब पासून ते तामिळनाडू आणि गुजरात पासून ते आसाम पर्यंत, अनेक राष्ट्रवादी नेते, लेखक, कवी, नाटककार यांनी छत्रपती शिवाजी यांना ब्रिटिशांविरुद्धच्या महान लढ्याचे प्रेरणास्थान म्हणून दर्शवले होते.
- महाराष्ट्राव्यतिरिक्त, ज्या राज्यांमध्ये छत्रपती शिवाजींचे व्यक्तिमत्व आणि शौर्य सर्वाधिक सांगितले जात होते ते बंगाल होते. याठिकाणी त्यांना आक्रमणकर्त्याच्या अत्याचाराविरुद्ध हिंदूंच्या उदयास पाठिंबा देणारा म्हणून फिनिक्स पक्ष्याच्या रूपात बघितले जात होते.
- लोकमान्य टिळकांच्या शिवजयंती उत्सवाने छत्रपती शिवाजी महाराजांना बंगाली लोकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवून दिली. थोर मराठा राजाचे स्मरण केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नव्हते, आणि टिळक हे देखील छ. शिवाजींशी जोडलेले एकमेव प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नव्हते.
- या लेखात असे सांगितले गेले आहे की, 1857 पासून छत्रपती शिवाजी महाराज हे बंगाली देशभक्तांसाठी प्रेरणास्थान बनले होते आणि टागोर आणि बिपिन चंद्र पाल पासून ते अरबिंदो घोष पर्यंत सगळ्यांनी त्यांची प्रशंसा केली होती.
- 1993 च्या बॉब स्फोट प्रकरणात पकडले गेलेल्या आतंकवाद्यांनी आपल्या अधिवक्ता प्रधान यांना सांगितले होते की, आम्हाला गेटवे ऑफ इंडिया येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बॉम्बच्या स्फोटाने उडवायचा होता. यावर त्यांचे वकिलांनी त्यांना विचारले की यामुळे तुमचा काय फायदा झाला असता? यावर त्यांनी सांगितले, "जर हा माणूस नसता तर संपूर्ण हिंदुस्थानात मुसलमानांचे राज्य राहिले असते, म्हणून त्यांचा पुतळा आम्ही बॉम्बच्या स्फोटाने उडवू इच्छित होतो.”
- छ. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आणि संदेश आज देखील केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि परदेशात देखील तेवढेच समर्पक आहेत, जेवढे पूर्वी होते.
- महाराष्ट्राचे राजकारण आजही छ. शिवाजी महाराजांच्या नावानेच चालते. लोकांच्या मनात छ. शिवाजी महाराजांबद्दल नितांत श्रद्धा आहे आणि त्यांना तिथे देवाचे रूप म्हणून पाहिले जाते.
शिवरायांचा जन्म 1630 मध्ये पुण्यातील शिवनेरी येथे झाला, त्यांच्यावर मा जिजाऊ यांचा सखोल प्रभाव होता
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला, पुणे येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव छ. शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई होते. छ. शिवाजीवर आपल्या आईच्या धार्मिक गुणांचा नेहमीच प्रभाव राहिला होता.
छ. शिवाजीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले होते त्यांना धार्मिक, राजनीतिक आणि युद्ध विद्येचे शिक्षण दिले गेले. शिवबांना आई जिजाऊ यांनी महाभारत, रामायण आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान दिले. त्यांनी बालपणीच राजकारण आणि युद्धनीती आत्मसात करून घेतली होती. त्यांचे बालपण भगवान राम, भगवान कृष्ण, हिंदू संत आणि रामायण, महाभारताच्या कथा ऐकण्यात आणि सत्संगांत गेले. ते सर्व कलांमध्ये पारंगत होते.
छ. शिवाजीला अनेक पत्नी होत्या. त्यांचा पहिला विवाह 14 मे 1640 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता. त्यांच्यापासून छ. शिवाजीला 4 मुले झाली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते होते, त्या अतिशय प्रसिद्ध महिला होत्या. छ. शिवाजीच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकार छत्रपती संभाजी यांना मिळाला, जे छ. शिवाजीचे थोरले पुत्र होते.

शिवरायांना अनेक उपाध्या मिळाल्या होत्या. 6 जून 1674 रोजी रायगड येथे त्यांना मराठ्यांचा राजा म्हणून भूषविले गेले. याव्यतिरिक्त, छत्रपती, क्षत्रिय कुलवंत, हिंदवी धर्मोद्धारक अशा उपाधी देखील त्यांच्या शौर्यामुळे त्यांना दिल्या गेल्या होत्या.
3 एप्रिल 1680 रोजी, आजारपणामुळे रायगड किल्ल्यावर त्यांचे निधन झाले.
(ही माहिती, मुंबईचे इतिहासकार आणि इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे सहसचिव प्रशांत रावदेव आणि महाराष्ट्र सरकारच्या छत्रपती छ. शिवाजी स्मारकच्या (मेमोरियलच्या) अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.)
सरकारने सांगितले की अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यावर बांधल्या जाणाऱ्या छत्रपती छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून 3643.78 रुपये खर्च होणार आहेत आणि या प्रकल्पाच्या सर्व बाबींचे बांधकाम 2022-23 पर्यंत पूर्ण होईल.
(Photo Credit: Wikipedia)