नवी दिल्ली. Viral News : ऑनलाइन औषध ऑर्डर करणे एका महिलेच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरला. औषधाचे पॅकेज उघडताच तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली व भीतीने ती थरथर कापू लागली. तिने ताबडतोब पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

ही घटना अमेरिकेतील केंटकी येथील हॉपकिन्सविले येथे घडली. पोलिसांनी महिलेची ओळख गुप्त ठेवली आहे. वृत्तानुसार, बुधवारी महिलेला एक पॅकेज मिळाले ज्यामध्ये औषधाऐवजी मानवी हात आणि बोटे होती. हे पॅकेज बर्फात पॅक केलेले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

त्या महिलेने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाली, आम्हाला औषधांची नितांत गरज होती. आम्हाला दोन बॉक्स सापडले. जेव्हा आम्ही एक बॉक्स उघडला तेव्हा त्यात मानवी शरीराचे अवयव होते, जे कदाचित प्रत्यारोपणासाठी होते. आम्ही हे कोणाचे आहेत आणि ते कुठे पाठवायचे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

महिलेने पोलिसांना फोन केला, जे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बॉक्स ताब्यात घेतला. तपासात असे दिसून आले की हा बॉक्स  नैशविल मेडिकल ट्रेनिंग फैसिलिटीकडे पाठवायचा होता व चुकून महिलेला देण्यात आला.

पोलिसांनी केले महिलेचे कौतुक -

    पोलिसांनी मानवी अवयव सुरक्षितपणे नॅशव्हिलला पोहोचवले आहेत. बॉक्समधील हात आणि बोटे चार वेगवेगळ्या दात्यांचे होते ज्यांना शस्त्रक्रियेच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.