कीव- रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूक्रेन आपले संरक्षण बजेट वाढवण्यासाठी एक अजब पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. यूक्रेनचे खासदार यारोस्लाव जेलेजनियाक यांनी सादर केलेल्या एका नव्या विधेयकानुसार देशात पोर्नोग्राफीला कायद्याच्या कक्षेत आणण्याची योजना सुरू आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, यूक्रेनचे खासदार आणि संसदेच्या अर्थ समितीचे अध्यक्ष यारोस्लाव जेलेजनियाक यांनी सादर केलेल्या या विधेयकात म्हटले आहे की, पॉर्न इंडस्ट्रीला कायद्याच्या कक्षेत आणल्यास देशाला जवळपास 25 मिलियन डॉलरचा टॅक्स (रेव्हेन्यू) मिळू शकतो. या पैशाचा उपयोग लष्करासाठी 30,000 युद्धक ड्रोन खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

7 वर्षापर्यंत तुरुंगवासाचे प्रावधान-

यूक्रेनमध्ये सध्या कायद्यानुसार एडल्ट कंटेंट (अश्लील सामग्री) चे निर्माण, साठा व वितरण पूर्णपणे बेकायदा आहे. याचे उल्लंघन केल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र तरीही भ्रष्टाचाराच्या आडून हा उद्योग सतत वाढत आहे.

टॅक्स दिल्यानंतरही तुरुंगवासाचा धोका -

यूक्रेनचे टॅक्स अधिकाऱ्यानी नुकतेच एडल्ट कंटेंट क्रिएटर्सकडून टॅक्स वसुली सुरू केली आहे. मात्र यामुळे क्रिएटर्ससमोर एक अजब आणि हास्यास्पद धर्मसंकट उभे राहिले आहे.

    संसदेच्या वित्त समितीचे अध्यक्ष यारोस्लाव जेलेजनियाक यांनी या  स्थितीचे विश्लेषण करताना सांगितले की, या महिला टॅक्स न देता गुन्हा करतात किंवा टॅक्स देऊन स्वत:ला अश्लीलतेच्या कायद्यात अडकवून घेतात. ही एक हास्यास्पद आणि दु:खद स्थिती आहे.

    काही लोकानी आपले उत्पन्न घोषित केल्यानंतर सरकारकडून पत्र प्राप्त झाले. यामध्ये त्यांच्यावर कर चोरीसह अवैधरित्या अश्लील सामग्रीचे उत्पादन केल्याचा आरोप केला आहे. 

    रशियाच्या आक्रमणाआधी यूक्रेनचे अधिकारी एडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करत असत, मात्र स्थिती आता बदलली आहे.

    20,000 डॉलरची लाच -

    जनरल प्रॉसिक्यूटर कार्यालयाच्या माहितीनुसार, तीन वेगवेगळ्या क्षेत्रांच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कारवाईपासून वाचवण्यासाठी जवळपास 20,000 डॉलरपर्यंत लाच घेतली होती. फेनिक्स इंटरनॅशनलच्या आकड्यानुसार वर्ष 2023 मध्ये 7,900 हून अधिक यूक्रेनियन लोकांनी या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून 131 मिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे.