नवी दिल्ली: दक्षिण चीन समुद्रात रविवारी एक मोठा अपघात झाला. अमेरिकेच्या नौदलाचे एक लढाऊ विमान आणि एक हेलिकॉप्टर नियमित लष्करी कारवाई दरम्यान अर्ध्या तासांच्या अंतराने कोसळले.

राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प आसियान शिखर परिषदेसाठी  कुआलालंपूर येथे असताना झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन विमान कोसळले -

अमेरिकन नौदलाच्या म्हणण्यानुसार, रविवारी दक्षिण चीन समुद्रात त्यांच्या दोन लष्करी विमानांना अपघात झाले. पहिला अपघात MH-60R सी हॉक हेलिकॉप्टरचा होता जो यूएसएस निमित्झ वरून नियमित ऑपरेशन करत असताना दक्षिण चीन समुद्रात कोसळले. नौदलाने सांगितले की शोध मोहीम पथकाने हेलिकॉप्टरमधील सर्व तीन क्रू सदस्यांना वाचवले.

सर्व क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले -

    अपघातानंतर सुमारे 30 मिनिटांनी, त्याच विमानवाहू जहाजावरून नियमित मोहिमेदरम्यान दक्षिण चीन समुद्रात एक बोईंग AF/A-18F सुपर हॉर्नेट लढाऊ विमान कोसळले. दोन्ही क्रू सदस्य यशस्वीरित्या बाहेर पडल्याचे अमेरिकन नौदलाने वृत्त दिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मध्य पूर्वेत कार्यरत असताना यूएसएस हॅरी एस. ट्रुमन विमानवाहू जहाजावरून दोन अमेरिकन युद्ध विमाने देखील कोसळली होती.