जेएनएन, मुंबई, Year Ender 2024: नवीन वर्षाला सुरवात व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. 2024 हे वर्ष आता प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवण बनून राहणार आहे. 2024 या वर्षात अनेकांना चांगले अनुभव आले तर अनेकांना वाईट अनुभव आले. मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकारांनी 2024 मध्ये आपल्या नव्या आयुष्याला सुरवात केली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी या वर्षात लग्नगाठ बांधली आहे. आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत कोणत्या कलाकारांनी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. 

प्रथमेश आणि क्षितिजा 
मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेता प्रथमेश परबने यंदा 24 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकला. प्रथमेश परबने यंदा क्षितीजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली.

पूजा आणि सिद्धेश 
2024 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने बिजनेसमन सिद्धार्थ चव्हाणशी लग्न गाठ बांधली. पूजाने 29  फेब्रुवारी 2024 रोजी सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. लग्नांनंतर पूजा आणि सिद्धेश दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. 

तितिक्षा आणि सिद्धार्थ तावडे
प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके या जोडप्याने 26 फेब्रुवारी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्यांनी मुंबईत कुटुंब आणि मंत्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.