नवी दिल्ली. Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि छावा फेम अभिनेता विकी कौशल आई-बाबा बनले आहेत. दोघांच्या आयुष्यात आता चिमुकल्याची एन्ट्री झाली आहे. कतरिनानं आज एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी विकीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे कतरिना कैफने (Katrina Kaif) सप्टेंबरमध्ये एका सुंदर पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. आता, अखेर तिच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. विकी कौशल बाप बनला आहे.
विकीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली. बाळाच्या जन्मानंतर, या जोडप्याला सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. कतरिना कैफला मुलगा झाला आहे.
कतरिना कैफने सप्टेंबर महिन्यात तिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती, त्यानंतर आता विकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे. कतरिनाने आज, शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. कॅतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या.
