जेएनएन, मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर राजकीय मैदानात उतरल्या आहेत. निशा परुळेकर यांना भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या नावामुळे निवडणुकीच्या चर्चेला वेग आला आहे. अभिनेत्रीला भाजपा प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्या विशेष चर्चेत आल्या होत्या. त्यांनी भरत जाधव यांच्यासोबत ‘सही रे सही’ या लोकप्रिय नाटकात काम केले आहे. तसेच ‘महानायक’ आणि ‘शिमणा’ या चित्रपटांतही त्या झळकल्या आहेत. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. दीर्घकाळ मनोरंजन क्षेत्रात कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी आता समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी राजकारणात पाऊल टाकले असून भाजपमध्ये प्रवेश केल

 राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 117 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अभिनय सोबतच राजकारणात अभिनेत्रीला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.