जेएनएन, मुंबई. Tumbadchi Manjula Box Office Collection: कारेगावकर दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असलेल्या तुंबाडची मंजुळा या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे यांनी या सिनेमात काम केलेले आहे.
सोमवारी किती कोटींचे कलेक्शन
5 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. विकेंडला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. विकेंडनंतर आता या सिनेमानं विकडेज म्हणजेच सोमवारीही चांगली कामगिरी केली आहे. रविवारी या सिनेमानं 1.93 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी या सिनेमानं नेमके किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
तुंबाडची मंजुळाचे सोमवारचे कलेक्शन
चौथ्या दिवशी, 'तुंबाडची मंजुळा' ने 0.70 कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई केली. यामुळे भारतातील एकूण 'ग्रॉस' (एकूण) कमाई 4.45 कोटी रुपये आणि एकूण 'नेट' (निव्वळ) कमाई 3.95 कोटी रुपये इतकी झाली आहे.
चौथ्या दिवशीची 0.70 कोटी रुपयांची कमाई ही कालच्या 1.73 कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या तुलनेत 59.5% घटली आहे.
तुंबडची मंजुळा या चित्रपटाने चार दिवसांत केलेली कमाई
| Day | India Net |
| Day 1 (1st Friday) | ₹0.54 Cr |
| Day 2 (1st Saturday) | ₹0.98 Cr |
| Day 3 (1st Sunday) | ₹1.73 Cr |
| Day 4 (1st Monday) | ₹0.70 Cr |
