जेएनएन, मुंबई: ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या 29 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचे गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘थोडा टाईट थोडा लूज साला कॅरॅक्टर’असे या गाण्याचे टायटल असून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वेने या गाण्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘थोडा टाईट थोडा लूज साला कॅरॅक्टर’ असे हे गाणे आहे. हे गाणे मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात असून,शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे. तर वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अजित परब यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अभिनेत्री मुक्त बर्वे, मधुरा वेलणकर यांनी या चित्रपटाचे रिलीज झालेले गाणे त्यांच्या सोशल मीडियावर रिलीज केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, चाळीशी लागलेल्या डोळ्यांत जेव्हा फुलतात विशीतली स्वप्नं...
मन स्वत:लाच समजावतं
थोडा टाईट थोडा लूज
साला कॅरॅक्टर
“अलीबाबा आणि चाळीशीतले चोर” 29 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात!