जेएनएन, मुंबई: अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत सुरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे.
जान्हवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, "मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा व्हिडिओ आता शेअर करतेय... कारण आता कन्फर्म सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सुरज लवकरच बाबा होणार आहे."
या पोस्टनंतर सुरजच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत सुरज आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे. जानवीने शेअर केलेला व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गोड बातमीमुळे सुरजच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत जान्हवी किल्लेकरचेही कौतुक केले आहे. "जान्हवी ताई, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने नातं निभावत आहेस," अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. तर दुसऱ्या युजरने, "अभिनंदन जान्हवी ताई, तुम्ही आत्या होणार आहात," अशी कमेंट करत जान्हवी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरजच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी चाहत्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा: 'देवाभाऊ, तुम्ही सांगितलं म्हणून खाल्लं'; नागपुरातील तर्री पोह्यांच्या प्रेमात पडले प्रवीण तरडे
