जेएनएन, मुंबई. Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 21 मे 2026 रोजी देऊळ बंद 2 हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

पहिल्या वीकेंडनंतर सकारात्मक प्रतिसाद

'देऊळ बंद 2'चे अनेक शोज हाऊसफुल्ल होत आहेत. इतंकच नाही तर अगदी पहाटेच्या शोलाही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 10 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. त्यानंतर रविवारी थेट 5.90 कोटी रुपयांची कमाई झाली. पहिल्या वीकेंडनंतर सोमवारीही कमाईचा आकडा सकारात्मक होता. सोमवारी 3.40 कोटी रुपये कमाई केली. 'देऊळ बंद 2' ने गेल्या पाच दिवसांत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

deool band 2
देऊळ बंद २

देऊळ बंद 2 चित्रपटाचे 5 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

  • पहिल्या दिवसाची कमाई 2.45 कोटी रुपये 
  • दुसऱ्या दिवसाची कमाई 2.55 कोटी रुपये 
  • तिसऱ्या दिवसाची कमाई 4.85 कोटी रुपये 
  • चौथ्या दिवसाची कमाई 5.90 कोटी रुपये
  • पाचव्या दिवसांची कमाई 3.40 कोटी रुपये

देऊळ बंद 2 बद्दल

'देऊळ बंद 2'मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. स्नेहल तरडे आणि मोहन जोशी या दोघांच्या भूमिकांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

    देऊळ बंद 2 चित्रपटातील भूमिका

    या चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे, अतुल कुदळे, रमेश परदेशी, मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर ,महेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ  निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.