जेएनएन, मुंबई:  ‘बिग बॉस 19’ चा बहुप्रतिक्षित ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून या सिझनचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये तान्या, अमाल मलिक, गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे यांचा समावेश होता. ट्रॉफी जरी गौरव खन्नाने पटकावली असली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर रनरअप ठरलेल्या प्रणित मोरेने आपल्या खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली.

ग्रँड फिनालेच्या मंचावर अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित होते. यावेळी एका खास टास्कदरम्यान प्रणित मोरेला प्रश्न विचारण्यात आला की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना तुला कोणते जुने ‘बॅगेज’ इथेच ठेवून जायचे आहे?”

या प्रश्नावर मिश्कील उत्तर देताना प्रणित म्हणाला,  “मी माझ्या शोमध्ये बॉलिवूड कलाकारांवर जोक्स करतो, त्यामुळे तेच ‘बॅगेज’ इथे ठेवायला आवडेल.” प्रणितच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देताना शोचा होस्ट सलमान खान म्हणाला,
“तुझं ते बॅगेज उतरवायची जबाबदारी तू घेऊ नकोस, ती जबाबदारी आम्ही घेतो.” यावेळी सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा करत सांगितले,  “मी लवकरच ‘किक 2’ चित्रपटावर काम करत आहे आणि त्यासाठी तुझं नाव मी 100 टक्के सुचवणार आहे.”

सलमान खानच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रणित मोरेवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

हेही वाचा: “यानंतर कधीही प्रणित मोरे शो फुकट करू नकोस” – सलमान खानचा प्रणित मोरेला खास सल्ला