जेएनएन, मुंबई: सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अश्विनी महागडे यांनी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, त्यांनी आपल्या भावनिक पोस्टद्वारे या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महागडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे नाव माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे आहे. या संस्थेमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला. या पाच वर्षांचा प्रवास मी कधीही विसरणार नाही.” त्यांनी पुढे नमूद केले की, पदाचा राजीनामा म्हणजे काम संपले, असे मानत नसून पुढील वाटचालीत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हा अनुभव नक्कीच उपयोगी ठरेल.

आपल्या कार्यकाळात केवळ आपण नव्हे तर संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळेच प्रतिष्ठानचे कार्य यशस्वी झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या नियमानुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी पद सोडले असून, पुढील अध्यक्षांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी अखेरीस, “मला ज्यांनी या प्रवासात सावरून घेतले, त्यांची मी कायम ऋणी राहीन,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा राजीनामा सामाजिक आणि कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या असून, निष्ठावान, निस्वार्थी सेवा हीच माझ्या राजाची शिकवण जी तुम्ही योग्य रीतीने पार पाडताय.. अश्या भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहे. तर काहींनी अश्विनी महागडे यांच्या या निर्णयावर दुःख व्यक्त केले आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, योग्य निर्णय. आता राजकारणात सक्रिय राहा. हिंदू विरोधी पक्षातून बाहेर पडून हिंदुत्ववादी शक्ती मजबूत करा. महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हिंदूंचे राज्य दिल्लीत कायम राहणे गरजेचं असतं

हेही वाचा: “तुमच्यासोबत म्हातारं होण्यात लई मजा आहे…” – लग्नाच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त हेमंतची क्षितीसाठी खास पोस्ट व्हायरल