मुंबई. टीव्ही अभिनेत्री श्वेता केसवानी बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. ती आपल्या बोल्ड विचारांसाठी ओळखली जाते. श्वेता सध्या परदेशात पती-मुलासोबत राहते. तिची दोन लग्ने झाली आहेत.
एका पॉडकास्टमध्ये श्वेता केसवानीने खुलासा केला की, तिने अनेक वेळा वन नाईट स्टँड केले आहे. त्या सर्वांसोबत तिची अजूनही मैत्री आहे. सिद्धार्थ कननच्या शोमध्ये श्वेताने सांगितले की वन नाईट स्टँडनंतर काही व्यक्तींसोबत तिचे शॉर्ट रिलेशनशिप्स राहिले आहेत. त्यापैकी काही तिचे आजही चांगले मित्र आहेत. श्वेता म्हणते तिची सर्व नाती सिरियस राहिली आहेत.
वन नाईट स्टँडनंतर तिने पार्टनरसोबत चर्चा केली. ती मेंटल स्ट्रेंथवर जास्त फोकस करते. श्वेताने एक गोष्ट आवर्जून सांगितली की, तिचे वन नाईट स्टँड कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत राहिले नाहीत. तिने मित्रांसोबतच वन नाईट स्टँड केले आहेत. श्वेताने तिच्या पहिल्या पतीसोबतही वन नाईट स्टँड केले होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. परंतु नंतर त्यांचे नाते फारकाळ चालले नाही, व दोघांनी मूव्ह ऑन केले.
श्वेताने सांगितले की, तिने तिचा एका मित्राला वन नाईट स्टँडनंतर दुसऱ्या दिवशी सुनावले होते. श्वेताने थेट म्हटले- तू बेडवर चांगला नाहीस. आतापासून भेटू नकोस. श्वेताचे पहिले लग्न Alexx O'Nell सोबत झाले होते. 4 वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये लग्न केले. मग 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. वेगळे झाल्यानंतरही ते चांगले मित्र राहिले. श्वेतासोबत लग्न मोडल्यानंतर अलेक्सने कामसूत्र फेम अभिनेत्री शमा सिकंदरला डेट केली होती. अलेक्ससोबत बिसल्यानंतर श्वेताने Ken Andino सोबत दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगीही आहे. हे कपल न्यूयॉर्कमध्ये राहते. Ken सोबत लग्नापूर्वी श्वेता लिव्ह-इनमध्ये राहिली होती.
