जेएनएन, मुंबई – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दिशा परदेशी वर नुकत्याच तिच्या बिकिनीतील फोटोशूटवरून ट्रोल करण्याचा प्रकार घडला. एका नेटकऱ्याने तिच्या फोटोखाली “महाराष्ट्रात राहायची लायकी नाही तुमची” असा आक्षेपार्ह कमेंट केला. मात्र अभिनेत्रीने त्यावर धाडसी प्रतिक्रिया देत तो स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.

दिशाने त्या ट्रोलिंग उत्तर देत कमेंट्समध्ये लिहिले – “या माननीय महोदयांना आता काय रिप्लाय द्यावा हे समजत नाहीये… आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावे.”

काही वेळानंतर ती कमेंट डिलीट करण्यात आली आणि संबंधित नेटकऱ्याने दिशाची माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.  दिशा परदेशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपल्या कामगिरीचे, वैयक्तिक क्षणांचे आणि फोटोंचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या बिकिनी फोटोशूटवरून काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, मात्र अभिनेत्रीने त्याला ठामपणे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. 

या घटनेनंतर तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे. दिशा परदेशीने ‘मोगरा फुलला’, ‘सखी’ आणि काही लोकप्रिय वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे. तिच्या साधेपणासोबतच ती समाजातील विविध विषयांवर मोकळेपणाने बोलण्यासाठी ओळखली जाते. दिशा झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील भूमिकेमुळे विशेष प्रसिद्ध झाली.

हेही वाचा: मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदलले, आता ‘तू बोल ना’ या नावाने होणार प्रदर्शित