जेएनएन, नवी दिल्ली. Delhi Election Exit Poll Result 2025: दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.78 टक्के मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदार आपापल्या मतदान केंद्रांवर रांगेत उभे होते. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

सात वाजल्यानंतर अनेक संस्थांनी दिल्ली निवडणुकीसंदर्भात आपला आपला निवडणूक पूर्व कल व्यक्त केला आहे. यातील अनेक संस्थांनी भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. (Delhi Exit Poll Result 2025)

पीपल्स इनसाईटच्या अंदाजानुसार दिल्लीत भाजप सरकार

पीपल्स इनसाईटने भाजपला 40-44 जागा दिल्या आहेत. तर आम आदमी पक्षाला 25-29 जागा दिल्या आहेत. काँग्रेसला फक्त 0-1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

दिल्लीत माइंड ब्रिंकनुसार'आप' सरकार होणार स्थापन

माइंड ब्रिंक संस्थेने आम आदमी पक्षाला 44-49 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शवला आहे. त्यांनी भाजपला 21-25 आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

    वीप्रीसाइड संस्थेनुसार

    वीप्रीसाइड संस्थेनं सर्वात वेगळे निकाल दाखवले आहेत. आम आदमी पक्षाला 46-52 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर भाजपला 18-23 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

    पीपल्स पल्सने भाजपला दिल्या भरघोस जागा 

     पीपल्स पल्सने भाजपला मोठा विजय मिळेल असा दावा केला आहे. त्यांनी भाजपला 51-60 जागा, आपला 10-19 जागा आणि काँग्रेसला शून्य जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

    पी मार्कनुसार भाजप सरकार

    पी मार्कने आम आदमी पक्षाला 21-31, भाजपला 39-49 आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

    जेव्हीसीच्या अंदाजानुसार भाजपाला बहुमत

    जेव्हीसीने आम आदमी पक्षाला 21-31 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर भाजपला 39-45 जागा तर काँग्रेसला फक्त 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

    मॅट्रिक्स एजन्सीनुसार भाजपला 35-40 जागा 

    मॅट्रिक्स एजन्सीनुसार, आम आदमी पक्षाला 32-27 जागा मिळू शकतात, तर भाजपला 35-40 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.

    चाणक्य रणनीतीनुसार दिल्लीत भाजप सरकार

    चाणक्य रणनीतीनुसार भाजपला 39 ते 44 जागा मिळू शकतात. त्याचवेळी, काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाला 25-28 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

    डीव्ही रिसर्चनुसार भाजपला बहुमत 

    डीव्ही रिसर्चच्या पोलमध्ये, यावेळी भाजप सरकार स्थापन करत असल्याचे दिसून आलं आहे. भाजपला 36-44 जागा, आपला 26-34 जागा आणि काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

    पोल डायरीनुसार भाजप येणार सत्तेत

    पोल डायरीनुसार, दिल्लीत भाजपला 42-50 जागा, आम आदमी पक्षाला 18-25 जागा तर काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.