जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 938 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 (MPSC Group C Joint Preliminary Exam 2025) द्वारे होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. येत्या 4 जानेवारी रोजी राज्यातील 37 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 ची जाहिरात 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीनुसार उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा, तांत्रिक सहायक पदाच्या 4, कर सहायक पदाच्या 73, तर लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 

त्यासाठी उमेदवारांना आज म्हणजेच 27 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी 29 ऑक्टोबर, तर परीक्षा शुल्क बँकेत भरण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 

    • लिपिक टंकलेखक - 852
    • कर सहायक - 73
    • तांत्रिक सहाय्यक - 04
    • उद्योग निरीक्षक - 09
    • एकूण जागा - 938 
    • अर्ज करण्याचा कालावधी - 27 ऑक्टोबर 2025
    • परीक्षा दिनांक - 04 जानेवारी 2026

    जाहिरात तुम्ही सविस्तर इथे पाहु शकता..