जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. त्यानुसार यंदा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल कधी लागणार

निवेदनानुसार, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.’ असे त्यांनी म्हटलं आहे.  

12th Passing Mark: बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के गुण आवश्यक?

  • बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेडदेखील मिळतील.
  • ग्रेडिंग सिस्टीमनुसार 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. 
  • 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. 
  • 5 टक्के ते 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. 
  • उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 35 पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. 

ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल? (How to download your 12th-grade marksheet online?)

  • विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. 
  • पहिल्यांदा वरील वेबसाइट उघडा.
  • ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
  • ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
  • ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.

2026 च्या बारावीच्या निकालाची वेळ (Class 12 Result on 2 May)

    12 वी (When HSC result Declared) : 2 मे 2026 चा रोजी दुपारी 1 वाजता.

    बारावीचा निकाल कसा पाहायचा (How to Check the 12th Results)

    • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावीचा निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला  https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
    • तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करावे लागेल.
    • आता तुम्हाला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून 'निकाल पहा' बटणावर क्लिक करावे लागेल.
    • यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल, जिथून तुम्ही तो तपासू शकाल तसेच गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकाल.

    दहावी - बारावीची परीक्षा कधी झाल्या? 

    2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत झाली, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली.