Indian Navy Agniveer Recruitment: भारतीय नौदलातील अग्निवीर (एसएसआर/एमआर) आणि एसएसआर (वैद्यकीय) पदांसाठी ऑनलाइन भरती आज, 14 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल आहे.

ग्निव्हर एसएसआर साठी पात्रता

Indian Navy Agniveer Bharti 2026 News: अग्निवीर एसएसआर (वरिष्ठ माध्यमिक भरती) साठी, उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह किमान 50% गुणांसह 10+2 उत्तीर्ण केलेली असावी किंवा उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल किंवा संगणक विज्ञान यासारख्या अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये 50% गुणांसह तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अग्निवीर एमआरची आवश्यक पात्रता

Indian Navy Agniveer Recruitment Update: अग्निवीर एमआर (मॅट्रिक रिक्रूट) साठी, भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण पात्र असतील.

याशिवाय, एसएसआर (वैद्यकीय) साठी विशेष पात्रता निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह 10+2 मध्ये किमान 50 टक्के एकूण गुण आणि प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत.

    अधिकृत वेबसाइटवर करा ऑनलाइन अर्ज 

    Agniveer Bharti 2026: संरक्षण विभागाचे प्रवक्ते विंग कमांडर देबार्थो धर यांनी सांगितले की, उमेदवारांसाठी राष्ट्रीय सेवा निवडण्याची ही एक उत्तम संधी आहे. अर्ज थेट अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in किंवा www.ssc.gov.in द्वारे करता येतील. या भरतीशी संबंधित सर्व माहिती वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. 

    परीक्षेची फी

    General / OBC / EWS - Rs. 250/-

    SC / ST - Rs. 250/-

    Payment Mode - Online Payment

    महत्त्वाच्या तारखा

    • अर्ज भरणे सुरु -13/02/2026
    • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 01/04/2026
    • फीस भरण्याची शेवटची तारीख - 01/04/2026
    • परीक्षा दिनांक - 01 ते 15 June 2026 

    हेही वाचा- RTE Admission 2026: पालकांना मोठा दिलासा... आरटीई प्रवेशासाठी 1 किमीची अट स्थगित, अर्जाची मुदतही वाढवली