जेएनएन, नागपूर: मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेशासाठी राज्य सरकारने घातलेल्या 1 किमी अंतराच्या अटीला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारने 12 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी परिसरातील शाळांनाच अर्ज करता येईल, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (RTE) कायद्यात अशा अंतराची अट नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित तरतुदींना स्थगिती दिली.
दरम्यान, या निर्णयानंतर RTE प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे पूर्वी अटींमुळे अर्ज करू न शकलेल्या पालकांना आता पुन्हा संधी मिळणार आहे.
हेही वाचा: चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IPS अधिकारी, देवने UPSC परीक्षेत पटकवला 152 वा क्रमांक
