जेएनएन, मुंबई. राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शैक्षणिक क्षेत्रालाही मोठा बसला आहे. डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (Directorate of Medical Education and Research) तर्फे होणाऱ्या विविध भरती आणि शैक्षणिक परीक्षा तात्पुरत्या रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती DMER च्या प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थी सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर DMER प्रशासनाने परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
DMER कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार –
- पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट आणि सूचना तपासत राहावेत.
- पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.
लवकर नवीन वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी
दरम्यान, या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी, अनेकजण परीक्षा कधी होणार याबाबत संभ्रमात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे शक्य तितक्या लवकर नवीन वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे.