नवी दिल्ली: लहान बचत योजनांमध्ये (Small saving scheme) गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी 30 सप्टेंबर 2026 चा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सरकार या दिवशी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public provident fund-PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya samriddhi yoajana-SSY) आणि किसान विकास पत्र (Kisan vikas patra KVP) सारख्या लोकप्रिय बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल. हा आढावा आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर (October-December 2026) साठी घेतला जाईल.

गुंतवणूकदारांचे लक्ष आता या गोष्टीवर टिकून आहे की सरकार सणासुदीच्या कालावधीपूर्वी व्याजदरात वाढ करून भेट देईल, की जुने दरच कायम ठेवले जातील.

30 सप्टेंबरला होणार घोषणा?

नियमांनुसार, सरकार दर तीन महिन्यांनी स्मॉल सेविंग्स स्कीम्सच्या व्याजदरांचा आढावा घेते. गेल्या वेळी 30 जून 2026 रोजी जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी दरांची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. आता पुढील तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) नवीन दरांची घोषणा 30 सप्टेंबरला होणार आहे. 

यावेळी वाढणार का व्याजदर?

स्मॉल इनवेस्टमेंट स्कीमचे व्याजदर थेट सरकारी बाँडच्या यील्डशी (Government securities Yield) जोडलेले असतात. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या चीफ इकॉनॉमिस्टच्या मते, जूनच्या अखेरपासून दीर्घ कालावधीच्या सरकारी बाँड यील्डमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. 30 जून 2026 रोजी 10-ईयर गव्हर्नमेंट बाँड यील्ड सुमारे 6.74% होती, जी 22 सप्टेंबरपर्यंत वाढून जवळजवळ 7.05% पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच या काळात यील्डमध्ये सुमारे 31 बेसिस पॉईंट्सची उसळी आली आहे. हे पाहता तज्ज्ञांचे मानणे आहे की लहान बचत योजनांचे दर एकतर सध्याच्या स्तरावर राहू शकतात किंवा सरकार यामध्ये मर्यादित वाढ करू शकते.

    कोणत्या योजनेवर सध्या मिळतो किती व्याज?

    • सुकन्या समृद्धी योजना: 8.2% वार्षिक
    • सिनियर सिटीझन सेविंग्स स्कीम (SCSS):8.2% वार्षिक
    • नॅशनल सेविंग सर्टिफिकेट: 7.7% वार्षिक
    • किसान विकास पत्र: 7.5% वार्षिक
    • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड: 7.1% वार्षिक

    PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेसारखे पर्याय दीर्घ कालावधीच्या वेल्थ क्रिएशनसाठी वापरले जातात. या योजनांच्या व्याजदरात 0.10% चा किरकोळ बदलही अनेक वर्षांच्या कंपाउंडिंग रिटर्नमध्ये मोठा फरक निर्माण करतो. तर, किसान विकास पत्र (KVP) मध्ये व्याजदर वाढल्याने पैसे दुप्पट होण्याची मुदत (Maturity Period) देखील कमी होते.