1जानेवारी रोजी देशभरात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना, आज सकाळी गॅस एजन्सींनी महागाईचा मोठा धक्का दिला. सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तुमच्या शहरात 14 किलो आणि 19 किलोच्या सिलिंडरची किंमत किती आहे ते जाणून घेऊया.
गॅस एजन्सी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती सुधारित करतात. यावेळी, गॅस एजन्सीने फक्त 19 किलोच्या सिलिंडरमध्ये सुधारणा केली आहे. 14 किलोच्या किंवा घरगुती सिलिंडरची किंमत तशीच आहे.
तुमच्या शहरातील 19 किलोच्या सिलेंडरमध्ये किती बदल झाला आहे ते आधी जाणून घेऊया?
19 किलोच्या सिलेंडरची किंमत
| शहर | पूर्वीची किंमत (₹) | आताची किंमत (₹) |
| दिल्ली | १५८०.५० | १६९१.५० |
| कोलकाता | १६८४.०० | १७९५.०० |
| मुंबई | १५३१.५० | १६४२.५० |
| चेन्नई | १७३९.५० | १८४९.५० |
