नवी दिल्ली. सरकारने योजलेल्या अनेक उपाययोजनानंतर सोमवारी देशभरात साखरेच्या सरासरी किरकोळ दरात सलद चौथ्या दिवशी घसरण पाहायाला मिळाली. साखरेचे दर 60 रुपये प्रति किलोच्या आतमध्ये राहिले आहेत. दरम्यान सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळे काही ठिकाणी किमतींवर तणाव पाहायला मिळाला.

पुरवठा मंत्रालयाच्या आकड्यानुसार, साखरेचे किरकोळ दर सोमवारी 59.57 रुपये प्रति किलो होती. जे एक दिवसाआधी 58.99 रुपये प्रति किलो होते.

शुक्रवारी साखरेचे दर 60 रुपये प्रति किलोच्या आत आले होते आणि मागील तीन दिवसांपासून हे दर स्थिर राहिले आहेत. सरासरी किरकोळ दर अजूनही  58.23 रुपये प्रति किलोहून अधिक आहे.

21ऑगस्ट रोजी साखरेचे दर इतके भडकले होते की, पहिल्यांदाच केंद्र सरकारने साखरेच्या आयातीस परवानगी दिली होती. त्याचबरोबर याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य उपाय केले होते.

मंत्रालयाच्या आकड्यानुसार, सोमवारी कमाल किरकोळ किंमत 85 रुपये प्रति किलोवर स्थिर होती. तर किमान किंमत 40 रुपये प्रति किलो होती. दक्षिणेतील राज्यांत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात किरकोळ दरात किंचित वाढ झाली तर तामिळनाडू आणि केरळमध्ये किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

आंध्र प्रदेशमध्ये साखरेचे दर वाढून 55.56 रुपये प्रति किलो झाले जे 21 ऑगस्ट रोजी 49.58 रुपये प्रति किलो होते.