मुंबई. गणेशोत्सव तसेच आगामी सणासुदीचा काळ (Festive Season) सुरू होण्याआधीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. उद्या म्हणजेच १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात ₹९ ची थेट वाढ करण्यात आली असून, यामुळे किचनचे बजेट बिघडणार आहे. दुधाचे दर अचानक का वाढले याबद्दल सविस्तर माहिती घेऊया..

अचानक कसे वाढले दुधाचे दर?

महाराष्ट्रामध्ये 1 सप्टेंबरपासून दुधाचे दर 9 रुपयांनी महागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ अचानक झालेली नाही; यापूर्वी 11 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया महासंघाने (Milk Producers and Processors Welfare Association) गाय आणि म्हैस दोन्हीच्या दुधाच्या दरात ₹2 ने वाढ केली होती. त्यानंतर आता थेट ₹9 ची मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे.

2026 मध्ये यापूर्वीही अनेकदा वाढले दर

या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतच दुधाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसली आहे:

  • मे 2026: अमूल आणि मदर डेअरीने 14 मे 2026 रोजी दुधाचे दर 2 रुपये प्रतिलिटरने वाढवले. यासोबतच राजस्थानची सरस, मध्य प्रदेशची सांची आणि महाराष्ट्रातील गोकुळ यांसारख्या प्रादेशिक डेअऱ्यांनीही आपले दर वाढवले होते.
  • जून 2026: जूनच्या सुरुवातीला केरळच्या 'मिल्मा' डेअरीने दुधाचे दर 4 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवले.
  • ऑगस्ट-सप्टेंबर 2026: ऑगस्टमध्ये प्राथमिक वाढ झाल्यानंतर, आता 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात ₹9 ची मोठी वाढ लागू होत आहे.

अजून वाढणार दुधाचे दर?

    महागाईच्या आघाडीवर सध्या तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. 'CRISIL' या रेटिंग एजन्सीनुसार, चालू आर्थिक वर्षात दुधाचे दर 4 ते 5 टक्क्यांनी आणखी वाढू शकतात. कंपन्या ही वाढ एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करतील. तसेच तूप, पनीर, दही आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या (Dairy Products) किमतीतही 5 ते 6 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

    दूध महाग होण्यामागची मुख्य कारणे काय?

    1. चारा आणि पशुखाद्याचा वाढता खर्च: जनावरांच्या चार्‍याच्या आणि देखभालीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
    2. हवामानाचा फटका: तीव्र उष्णता आणि कमकुवत मान्सूनमुळे जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
    3. वाढती मागणी: देशात दुधाची मागणी सतत वाढत आहे; त्यातच सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांची मागणी आणखी तीव्र होते. या सर्व कारणांमुळे दुधाचे दर सातत्याने वाढत आहेत.

    हे ही वाचा -महागाईचा आणखी एक झटका.. साखरेनंतर दूधही 9 रुपयांनी महागणार; काय असणार नवीन दर?