नवी दिल्ली: आजच्या जमान्यात आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात मौल्यवान व महत्वपूर्ण सरकारी कागदपत्रांपैकी एक बनले आहे. बँकेत खाते खोलणे असो, सरकारी योजनांचा लाभ घेणे असो किंवा हॉटेलमध्ये खोली बुक करायची असेल प्रत्येक ठिकाणी आधारची गरज पडते.
कधीतरी असे होते की, आपण आधार कार्ड घरीच विसरून जातो आणि अचानक याची गरज भासते. अशावेळी सायबर कॅफे शोधणे किंवा UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन लांबलचक प्रोसेस फॉलो करणे खूपच वेळखाऊ प्रोसेस असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही आपल्या स्मार्टफोनमधील WhatsApp च्या माध्यमातून खूपच सोप्या स्टेप्स फॉलो करून आधार कार्ड डाउनलोड करू शकता?
भारत सरकारच्या MyGov सुविधेच्या माध्यमातूतन हे संभव आहे. जाणून घेऊया याची स्टेप-बॉय-स्टेप प्रोसेस..
WhatsApp च्या माध्यमातून आधार कसे करायचे डाउनलोड?
- स्टेप 1: सर्वात आधी आपल्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये भारत सरकारच्या MyGov Helpdesk नंबर +919013151515 सेव्ह करावा लागेल.
- स्टेप 2: नंबर सेव्ह केल्यानंतर आपले WhatsApp ओपन करा. सेव्ह केलेल्या या कॉन्टॅक्टची चॅट ओपन करा आणि तेथे नमस्ते किंवा Hi लिहून पाठवा
- स्टेप 3: मेसेज पाठवताच तुम्हाला MyGov कडून ऑटो-रिप्लाय येईल. या मेसेजमध्ये तुम्हाला COWIN Services आणि Digilocker Services हे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर Digilocker Services बटनावर क्लिक करा.
- स्टेप 4: त्यानंतर Digi Locker अकाउंट कन्फर्म करा, जर तुमचे अकाउंट नसेल तर तयार करा.
- स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाइप करावा लागेल.
- स्टेप 6: त्यानंतर आधारला लिंक रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तो मेसेजने पाठवा.
- स्टेप 7: OTP व्हेरिफाय होताच तुमच्या Digi Locker अकाउंटशी संबंधित सर्व कागदपत्रांची लिस्ट स्क्रीनवर दिसेल. या लिस्टमधून Aadhaar Card निवडा.
त्यानंतर काही क्षणातच तुमचे आधार कार्ड WhatsApp च्या माध्यमातून डाउनलोड होईल.
या गोष्टीकडे द्या लक्ष-
ही संपूर्ण सुविधा फ्री आणि सुरक्षित आहे. WhatsApp च्या माध्यमातून आधार डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक (Registered) असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला OTP प्राप्त होईल.
