मुंबई. Gold Silver Price Today on 19 March 2026:  आज शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीलाच 1,700 अंकांनी, तर एनएसई 500 हून अधिक अंकांनी घसरला. शेअर बाजारासोबतच आज सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Crash) दरातही मोठी घसरण झाली. सकाळी सुमारे 9:51 वाजता, चांदीच्या दरात (Silver Price Today)  प्रति किलो जवळपास 5,000 रुपयांची आणि सोन्याच्या दरात (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली.

सामान्यपणे डॉलर मजबूत झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी होते. कारण इतर चलनांमध्ये सोने तुलनेने महाग ठरते. जागतिक स्तरावर सोन्याच्या खरेदीत काही प्रमाणात घट दिसून येते. अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता कायम असली, तरी भारतात सोन्याच्या किमती तुलनेने कमी झालेल्या दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या किंमतीत दररोज घसरण होत आहे. 

Gold Price Today: सोन्याचा भाव किती?

सकाळी 10:25 वाजता, 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,52,090 असून, प्रति 10 ग्रॅम ₹935 ची घट झाली आहे. सकाळी 10:25 पर्यंत, सोन्याने प्रति 10 ग्रॅम ₹1,51,712 चा नीचांक आणि प्रति 10 ग्रॅम ₹1,52,248 चा उच्चांक गाठला होता.

Silver Price Today: चांदीचा भाव किती आहे?

सकाळी सुमारे साडेदहा वाजता, 1 किलो चांदीचा भाव 2,44,080 रुपयांवर होता, ज्यात 4114 रुपयांची घट झाली आहे. चांदीने आतापर्यंत 2,43,083 रुपये प्रति किलोचा नीचांक आणि 2,45,387 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला आहे.

    तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर किती आहे?

    हे दर  bullions वेबसाईटनुसार गुरुवार, 19 Mar 2026 सकाळी 11:20 AM वाजताचे आहेत.

    हे ही वाचा -एप्रिलपासून महागाईचा भडका! कार, टीव्ही, फ्रीज-AC सह इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे महागणार

    शहरसोन्याचा दरचांदीची किंमत
    मुंबई₹152,100₹242,500
    पुणे₹152,100₹242,500
    नागपूर₹152,100₹242,500
    नाशिक₹152,100₹242,500
    छत्रपती संभाजीनगर₹152,100₹242,500
    पणजी₹152,160₹242,140
    हैदराबाद₹152,340₹242,890
    कल्याण₹152,100₹242,500
    ठाणे₹152,100₹242,500