नवी दिल्ली. Gold Silver price today : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सोने खरेदीची चांगली संघी आहे. मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 1,20,490 रुपये आहे.
काल, 29 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) थोडीशी घसरण झाली. तथापि, आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यासोबतच चांदीची चमक (Silver Price Today) देखील फिक्की पडताना दिसत आहे. काल चांदीच्या किमतीत वाढ झाली असली तरी, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही प्रति किलो 200 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.
मागील दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल 10 हजारांनी घसरले आहेत. तर एक किलो चांदीच्या दरात 13000 रुपयांची घसरण नोंदवली आहे.
देशभरात सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया?
Gold Price Today: सोन्याचा भाव किती आहे?
सकाळी 10.29 वाजता, एमसीएक्स एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव 120,295 रुपये आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 371 रुपयांनी घसरला आहे. आतापर्यंत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 118,665 रुपयांचा नीचांक आणि प्रति 10 ग्रॅम 120,666 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
Silver Price Today : चांदीची किंमत किती आहे?
सकाळी 10.31 वाजता, एमसीएक्सवर 1 किलो चांदीचा भाव 145,585 रुपये आहे. चांदीचा दर प्रति किलो 496 रुपयांनी घसरला आहे. चांदीचा आतापर्यंतचा नीचांक 144,402 रुपये प्रति किलो आणि उच्चांक 1,46,000 रुपये प्रति किलो झाला आहे.
