नवी दिल्ली. अवघ्या काही दिवसावर दसरा आला आहे. त्यापूर्वीच कमोडिटी मार्केट उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी येत आहे. सकाळी 9:17 वाजतापासून चांदीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. 1 किलो चांदीच्या किमतीत 1,845 रुपयांची वाढ दिसून येत आहे. दरम्यान, सकाळी 9:18 वाजता सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 835 रुपयांनी वाढला आहे.
सर्वप्रथम, देशभरात सोने आणि चांदीचा सध्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊया.
Gold Price Today: सोन्याचा भाव किती?
सकाळी 9.27 वाजता, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 114547 रुपये झाला, ज्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 759 रुपयांची वाढ झाली. सोन्याने आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 114300 रुपयांचा नीचांक आणि प्रति 10 ग्रॅम 114,627 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
यापूर्वी, शुक्रवारी, 26सप्टेंबर रोजी, आयबीजेएमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 113349 रुपये नोंदवण्यात आली होती.
Silver Price Today: चांदीचा भाव किती?
सकाळी 9.30 वाजता, 1 किलो चांदीचा भाव 143140 रुपये प्रति किलो आहे. तर 143968 इतका उच्चांक आणि 141,758 रुपये प्रति किलो इतका कमी झाला आहे. चांदी सध्या 1251 रुपये प्रति किलोने वाढताना दिसत आहे.
26 सप्टेंबर रोजी आयबीजेएमध्ये चांदीचा भाव 137040 रुपये प्रति किलो नोंदवला गेला.
तुमच्या शहरातील सोन्याचा दर?
शहर | सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) | चांदीचे भाव (प्रति 1 KG) |
मुंबई | 115,920 | 143,210 |
पुणे | 115,920 | 143,210 |
सोलापूर | 115,920 | 143,210 |
नागपूर | 115,920 | 143,210 |
नाशिक | 115,920 | 143,210 |
कल्याण | 115,920 | 143,210 |
हैदराबाद | 116,130 | 143,480 |
नवी दिल्ली | 115,750 | 143,010 |
पणजी | 115,980 | 143,290 |