नवी दिल्ली. gold and silver prices : नवरात्रीच्या काळापासून सोने- चांदीच्या दरात मोठा उतार चढाव होत आहे. सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत आहे. लक्ष्मीकुबेर पुजनाच्या दिवशी सोने अथवा चांदीचे दागिने खरेदीचा विचार करत आहात का? आज मंगळवार, 21 ऑक्टोबर, 2025 रोजीचे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत ते जाणून घेऊया..
कालप्रमाणे आज देशभरातील अनेक शहरांमध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. हा सण वर्षातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. दिवाळीत सोने (Gold Price Today) आणि चांदी (Silver Price Today) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढत आहे.
21 ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया?
Gold Price Today : सोन्याची किंमत किती आहे?
काल संध्याकाळी आयबीजेए येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 127,633 रुपये होता. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 116,912 रुपये होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95,725 रुपये होता.
Silver Price Today : चांदीची किंमत किती आहे?
चांदीबद्दल बोलायचे झाले तर, 20 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 1 किलो चांदीची किंमत ₹163,050 होती. यापूर्वी, 17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी, चांदीची किंमत ₹169,230 प्रति किलो नोंदली गेली होती.
