नवी दिल्ली: सोने दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असल्याचं चित्र आहे, आज देखील पुन्हा मोठी घसरण झाल्याचं दिसून (Gold Silver Rate Today)येत आहे. बऱ्याच काळापासून दरांमध्ये सातत्याने घसरण पाहिली जात आहे. आजही जागतिक बाजारात गोल्ड-सिल्व्हरचे दर वेगाने घसरले. नवीन दरांवर एक नजर टाकूया.
सोने दरात सहा हजार रुपयांची घसरण होऊन काल (गुरूवारी, 19 नोव्हेंबर) 130000 हजार असलेले दर आज 124000 हजारवर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण होऊन काल (गुरूवारी, 19 नोव्हेंबर) असलेले 164000 असलेले दर आज 152000 वर खाली आले आहेत.
इंटरनॅशनल मार्केटमध्ये घसरले दर
इंटरनॅशनल मार्केट म्हणजेच Comex वर आज म्हणजेच शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात घसरण आली आहे. Comex वर सोन्यात 4.35% पर्यंतची घसरण आली (Gold Price on Comex) आणि हे 3525.00 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसले. तर चांदीचे (Silver Price on Comex) दर 7.11% पर्यंत तुटले आणि अशात किंमत 41.250 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसली.
देशांतर्गत बाजारात कोसळल्या किमती
सोने-चांदीच्या किमती सातत्याने घसरणीच्या टप्प्यातून जात आहेत. सोने 1 वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. आज पुन्हा देशांतर्गत बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोने स्वस्त होऊन सुमारे (gold price) ₹1.22 लाख प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करताना दिसले. तर चांदी घसरणीसोबत (Silver) ₹1.48 लाख प्रति किलोग्रॅमच्या आसपास ट्रेड करताना दिसली.
गुंतवणूक मंच मुड्रेक्सचे लीड क्वांट विश्लेषक अक्षत सिद्धांत म्हणाले, "मजबूत रुपयामुळे देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या हजर किमतींवर दबाव कायम राहिला."
MCX वर सोने-चांदी दोन्हीमध्ये मोठी घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर डिसेंबर डिलिव्हरीवाले सोने 5000 रुपयांपर्यंत घसरले आणि किंमत ₹1,22,430 (mcx gold silver price crash) प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना नजरेस पडली. तर चांदीबद्दल बोलायचे तर यामध्ये 9058 रुपयांपर्यंतची घसरण पाहिली गेली आणि किंमत ₹1,48,424 प्रति किलोग्रॅमवर (silver price today) पोहोचली.
खरेदीदारांची झाली चंगळ
बाजार उघडताच सोने-चांदी किमतींमध्ये घसरण पाहिली गेली. बोलायचे झाले गोल्ड रेट्सबद्दल तर 24 कॅरेट सोने (Gold Rates today) सुमारे ₹ 123,120 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत आहे, तर 22 कॅरेट सोने सुमारे ₹112,653 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास टिकून आहे. तर 18 कॅरेट गोल्ड ₹92,340 प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास ट्रेड करत आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत सुमारे ₹ 148,730 प्रति किलोग्रॅमच्या आसपास ट्रेड करताना दिसली.
