नवी दिल्ली. बँक यूनियन्सने आठवड्यातील पाच दिवस बँकिंग आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या संपामुळे देशातील अनेक भागातील बँकिंग सेवा ठप्प राहणार आहेत. विशेष करून सरकारी बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत.
11 सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे व त्यानंतर दोन दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. 14 सप्टेंबर रोजी अनेक राज्यात गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. त्यामुळे अनेक सरकारी बँकांनी आपल्या ग्राहकांना संपामुळे कामकाजावर पडणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती दिली आहे.
भारतीय स्टेट बँकेसह अन्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, संपामुळे अनेक बँक शाखांमधील कामकाज प्रभावित होऊ शकते.
आज शुक्रवार आहे त्यानंतर शनिवार व रविवारी बँकांना नियमित सुट्टी आहे. त्याचबरोबर अनेक राज्यातील बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. काही राज्यात 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
11 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी संप, 12 सप्टेंबर (दूसरा शनिवार), 13 सप्टेंबर (रविवार) आणि 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी बँका सलग 4 दिवस बंद राहू शकतात.
दरम्यान बँक व्यवस्थापनाने आवश्यक सेवा सामान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मात्र ग्राहकांना रोकड संकट आणि चेक क्लियरिंगमध्ये विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
