जेएनएन, मुंबई - Mumbai Metro : मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासाची नवी सोय उपलब्ध करून देणारी बहुप्रतीक्षित मेट्रो-2 बी मार्गिका लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. डी.एन. नगर–मंडाळे या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) पथकाकडून आजपासून मार्गिकेची तपासणी सुरू झाली आहे.

अशी असणार सेवा-

  • पहिला टप्पा मंडाळे–चेंबूरदरम्यान प्रवासी सेवेसाठी खुला होणार आहे.
  • पुढील टप्प्यांमध्ये हा मार्ग डी.एन. नगरपर्यंत जोडला जाणार आहे.
  • या मार्गावरून प्रवास केल्यास पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांच्यातील जोडणी अधिक वेगवान होणार आहे.

प्रवाशांना होणारे फायदे-

  • चेंबूर–मंडाळे परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे.
  • एसटी, लोकल किंवा रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
  • प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.
  • पूर्व–पश्चिम उपनगरातील संपर्क वाढणार आहे.