नवी दिल्ली. Gold and Silver Prices Today : आज, 9 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. काल, 8 सप्टेंबर रोजीही सोन्याच्या किंमती वाढलेल्या होत्या. 8 सप्टेंबर रोजी आयबीजेए सराफा बाजारात सोन्याने एक नवा विक्रम केला. आजही सोन्याच्या किमतीने आपली घौडदौड कायम राखली आहे. प्रथम देशभरात सोने आणि चांदीचा सध्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊया.

Gold Price Today: सोन्याचा भाव किती आहे?

आज, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता, एमसीएक्समध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम प्रति 109229 रुपये झाला आहे. त्यात 711 रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंत सोन्याने 1086000 रुपयांचा नीचांकी आणि 109,500 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.

8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयबीजेएमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 106,446 रुपये नोंदवण्यात आली.

Silver Price Today: चांदीचा भाव किती आहे?

एमसीएक्समध्ये 1 किलो चांदीची किंमत 126070 रुपये नोंदवली जात आहे. त्यात 499 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने आतापर्यंत 125,462 रुपयांचा नीचांकी आणि 126113रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.

    काल संध्याकाळी आयबीजेए येथे 1 किलो चांदीचा भाव 123170 रुपये नोंदवण्यात आला.