Aadhaar Card Download : सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र समजले जाते. कोणत्याही सरकारी कामासाठी व कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सक्तीचे असते. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल किंवा हॉटेल बुक करायचे असेल किंवा ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तरी आधार क्रमांक जरुरी असतो. आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI द्वारे जारी केले जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या WhatsApp वर देखील डाउनलोड करू शकता.
तुम्ही WhatsApp वरूनही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड WhatsApp द्वारे सहजपणे डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नंबरवर PDF स्वरूपात आधार कार्डची प्रिंट मिळवू शकता.
हे ही वाचा -जाहिरातींना 'राम राम'! जागरण डॉट कॉमने लॉन्च केला प्रीमियम प्लॅन, केवळ 69 रुपयांपासून सुरुवात
WhatsApp वरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती
- WhatsApp वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम MyGov Helpdeskचा अधिकृत WhatsApp नंबर +91-9013151515 तुमच्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह करा.
- आता WhatsApp उघडा आणि MyGov हेल्पडेस्क नंबरवर चॅट सुरू करा. यासाठी, HI लिहा आणि पाठवा.
- आता DigiLocker Services चा पर्याय निवडा. लक्षात ठेवा की WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुमचे सक्रिय DigiLocker खाते असणे आवश्यक आहे.
- आता तुमचा आधार कार्ड नंबर लिहा आणि Enter करा.
- आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.
- आता तुम्हाला तुमच्या DigiLocker खात्यात असलेले सर्व कागदपत्रे दाखवली जातील. यापैकी आधार कार्ड पर्याय निवडा, त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या व्हॉट्सअॅपवर येईल.
- यादीतून Aadhaar निवडण्यासाठी, त्याचा क्रमांक टाइप करा.
- काही सेकंदातच, तुमचे आधार कार्ड व्हॉट्सअॅप चॅटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल.