नवी दिल्ली. Apple चे लेटेस्ट iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री आजपासून सुरू झाला आहे. ॲपल फॅन्समध्ये नव्या मॉडलबाबत जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. लोक सकाळपासूनच ॲपल स्टोअरच्या बाहेर रांगा लावून उभे राहिले आहेत. ॲपलच्या दिल्ली, नोएडा, बंगळुरू आणि मुंबईतील स्टोअरच्या बाहेर लोक सकाळपासून उभे आहेत, त्यापैकी अनेक लोक रात्रीपासून स्टोअरच्या बाहेर आहेत.
मुंबईत टाळ्या वाजून ॲपल कर्मचाऱ्यांनी केले ग्राहकांचे स्वागत-
ॲपलच्या मुंबईतील स्टोअरमध्ये नव्या आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सची विक्री सुरू झाली आहे. स्टोअरमध्ये सकाळी आठ वाजता ग्राहकांना टाळ्या वाजून आतमध्ये स्वागत करण्यात आले.
#WATCH | Maharashtra: Apple begins the official sale of the iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max; a large number of people throng the company's store at Jio World Drive in Mumbai pic.twitter.com/PyFjeG24ag
— ANI (@ANI) September 18, 2026
अॅपल स्टोअरच्या बाहेरचे दृष्य -
#WATCH | Delhi: A throng of people starts gathering outside the Apple Store at Select Citywalk Mall in Saket early in the morning ahead of the highly anticipated sales launch of the iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max. pic.twitter.com/HreJboz21c
— ANI (@ANI) September 17, 2026
Bengaluru, Karnataka: Sales of Apple’s iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max are set to begin at 8 am today, with customers waiting outside the Apple Store at Phoenix Mall of Asia.
— IANS (@ians_india) September 18, 2026
A customer says, "I have already booked online. We have a 9 am slot and have booked two phones." pic.twitter.com/XrdC9RhQWv
सकाळी 8 वाजल्यापासून सेल सुरू -
ॲपलचे लेटेस्ट आयफोन 18 प्रो सीरीजची सेल आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. ॲपलचे लेटेस्ट लाँच प्रोडक्ट्स कंपनीच्या ऑनलाइन-ऑफलाइन स्टोअर, प्रमुख रिटेल स्टोअर आणि क्विक कॉर्मस प्लेटफॉर्मवरूनही खरेदी केले जाऊ शकतात.
VIDEO | Mumbai: People have been lining up outside Apple Store at Bandra-Kurla Complex since early morning ahead of the official sales launch of the iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max in India.#Apple #iPhone18Pro #Mumbai
— Press Trust of India (@PTI_News) September 18, 2026
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/jZBDIKgVVx
रात्री 10 वाजल्यापासून लोक रांगेत -
मुंबईत नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, ते रात्रीपासून येथे उभे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी फोनची प्री-बुकिंग केलेली नाही. त्यांच्या जवळ बारकोडही नाही. तरीही ते रांगेत थांबले आहेत. मुंबई स्टोअरच्या बाहेर नाशिकहून आलेले हितेश पटेल यांनी सांगितले की, रात्री 10 वाजता ते आले होते. त्यांना सकाळी 8 वाजताचा स्लॉट मिळाला आहे. हितेश प्रत्येक वर्षी आपला फोन अपडेट करतात. त्यांच्याकडे आता 17 Pro Max आहे आणि ते 18 Pro Max घेणार आहेत.
#WATCH | Mumbai: Massive crowds gather outside the Apple Store in Mumbai as eager customers queue up ahead of the official sales launch of the iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max in India. pic.twitter.com/vOGotGmyFE
— ANI (@ANI) September 18, 2026
iPhone 18 Pro ची किंमत-
ॲपल iPhone 18 Pro ची किंमत ₹1,64,900 पासून सुरू होते. यामध्ये 256GB व्हेरिएंट मिळतो. त्याचबरोबर तीन आणखी व्हिरिएंट आहेत. 512GB, 1TB आणि 2TB ही कंपनीने लाँच केले आहेत. त्यांच्या किंमती क्रमश: ₹1,89,900, ₹2,39,900 आणि ₹3,14,900 रुपये आहेत.
iPhone 18 Pro Max ची किंमत -
iPhone 18 Pro Max चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याचा बेस व्हेरिएंट 256जीबी ₹1,79,900, 512GB व्हेरिएंट ₹2,04,900, 1TB व्हेरिएंट ₹2,54,900 आणि 2TB ₹3,29,900 च्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.
